‘गंमत जंमत’, ‘अफलातून’ अशा एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये काम करून वर्षा उसगावकर यांनी ९० च्या दशकात अधिराज्य गाजवलं. मराठीसह बॉलीवूडमध्ये त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सचिन पिळगावकर, अशोक सराफ आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे अशा कलाविश्वातील दिग्गजांबरोबर त्यांनी काम केलं आहे. मूळच्या त्या गोव्याच्या आहेत. त्याकाळी गोव्याहून मुंबईत आल्यावर त्या कलानगर परिसरात राहत होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी त्यांचं घर होतं. याबद्दलच्या आठवणी त्यांनी नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्या आहेत.

वर्षा उसगावकर म्हणाल्या, “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं घर माझ्या शेजारी होतं. त्यामुळे मला छान २४ तास पोलीस प्रोटेक्शन असायचं. कलानगरला जाताना मला कधीही भीती वाटली नाही. रात्रीचे दोन-तीन किंवा चार वाजूदे तिथे कायम पोलिसांचा बंदोबस्त असायचा. माझी त्यांच्याशी अनेकदा भेट झालीये. ते माझ्याशी खूप गप्पा मारायचे. मला छान-छान गोष्टी सांगायचे. त्यांचा स्वभाव फार खेळकर होता.”

हेही वाचा : कौलारू घर, नदी, आंब्याची बाग अन्…; कोकणात आहे रवी जाधव यांचं सुंदर घर; म्हणाले, “संगमेश्वर तालुक्यात…”

वर्षा पुढे म्हणाल्या, “बाळासाहेब खूप मार्मिक बोलायचे. काय गं गोव्याची मुलगी, तू कशी काय गोव्यावरून इथे आलीस? एकदा माझी आई आणि मी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी आम्हाला त्यांनी अनेक जोक्स आणि किस्से वगैरे सांगितले. मी बिअर पितो पण कॅलरीशिवाय हा… असा त्यांचा गमतीशीर स्वभाव होता. त्यांचा स्वभाव मला खूप आवडायचा.”

हेही वाचा : हिरवी साडी, नाकात नथ अन्…; पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा, पहिला फोटो आला समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ज्या बाळासाहेब ठाकरेंबद्दल वृत्तपत्रात लिहून येतं, तेच माझ्या शेजारी राहतात. मला दररोज त्यांचं दर्शन व्हायचं. त्याकाळी महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे वेगळं समीकरण तयार झालं होतं. त्यामुळे एवढ्या मोठ्या माणसाचं दररोज दर्शन, त्यांच्या शेजारी राहणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती.” असं वर्षा उसगावकरांनी सांगितलं.