अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णी यांच्या लग्नाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. २५ डिसेंबर २०२३ रोजी या दोघांनी पुण्यात लग्नगाठ बांधली होती. स्वानंदी-आशिषच्या लग्नासमारंभातील बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लग्नाला १ महिना पूर्ण झाल्यावर अभिनेत्रीने तिच्या विवाहसोहळ्यातील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

स्वानंदीने शेअर केलेल्या व्हिडीओच्या प्रारंभी तिचा नवरा आशिष कुलकर्णी आपल्या लाडक्या बायकोसाठी गाणं गात असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर पुढे, या व्हिडीओमध्ये ग्रहमख, मेहंदी, संगीत, हळद, सप्तपदी आणि शेवटी लग्नाची वरात याची झलक पाहायला मिळते.

हेही वाचा : Video : रितेश देशमुखचा पत्नी जिनिलीयासह ‘त्या’ लोकप्रिय गाण्यावर भन्नाट डान्स! १८ वर्षांपूर्वीच्या आठवणींना दिला उजाळा

स्वानंदीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या आई-बाबांनी म्हणजेच उदय व आरती टिकेकर यांनी स्वानंदी-आशिष एकमेकांना कसे अनुरुप आहेत याबद्दल सांगितलं आहे. तसेच अभिनेत्रीच्या सासू-सासऱ्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे. स्वानंदीचे सासरे या व्हिडीओमध्ये सांगतात, “तिचं काम आम्ही पहिल्यापासून पाहत आलो आहोत. स्वानंदी अतिशय सुंदर अभिनय करते. ती आमची सून नव्हे तर मुलगी आहे. आम्ही तिचा केव्हाच आमची लेक म्हणून स्वीकार केला आहे. तिच्या स्वभावात कधीही मी ‘द स्वानंदी टिकेकर’ आहे असं आम्हाला जाणवलं नाही. आशिषसाठी ती अतिशय योग्य मुलगी आहे.”

हेही वाचा : ९० कोटींचं कर्ज, बंगल्यावर जप्ती अन्…; अमिताभ बच्चन यांना कठीण प्रसंगात धीरूभाई अंबानींनी दिलेला मदतीचा हात, पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वानंदी-आशिषच्या रिसेप्शन पार्टीत कुलकर्णी व टिकेकर कुटुंबाने मिळून एकत्र एन्ट्री घेतली होती. त्यामुळे या व्हिडीओमध्ये दोन्ही कुटुंबाची एकत्रित झलक अभिनेत्रीच्या चाहत्यांना पाहायला मिळाली. दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.