‘दुनियादारी’, ‘मितवा’, ‘भिकारी’, ‘मुंबई पुणे मुंबई’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमुळे स्वप्नील जोशी घराघरांत लोकप्रिय झाला. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज अशा चारही माध्यमांवर अभिनेत्याने काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वप्नील चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त परदेशात गेला होता. नुकताच तो भारतात परतला आहे. मायदेशी परत आल्यावर अभिनेत्याचं कसं स्वागत झालं? याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “महाराजांची वाघनखं आणताय त्यासाठी अभिनंदन, जमलं तर…”, नाना पाटेकरांनी सुधीर मुनगंटीवारांना लगावला टोला

मायदेशी परतलेल्या बाबांना पाहून स्वप्नील जोशीची मुलं खूप आनंदी झाली होती. स्वप्नीलचं स्वागत करण्यासाठी त्याची मुलं मायरा आणि राघव दोघेही विमानतळावर गेले होते. दोघांनीही धावत येऊन अभिनेत्याला मिठी मारली आणि त्याच्यासाठी बनवलेली ग्रिटींग कार्ड्स त्याला दिली.

हेही वाचा : वाढदिवसानिमित्त अक्षय कुमार झाला बाबा महाकालसमोर नतमस्तक; आगामी चित्रपटाच्या यशासाठी केली प्रार्थना

स्वप्नील जोशीने विमानतळावरचा हा गोड व्हिडीओ शेअर करत याला “मायदेशी परत आल्यावर असं स्वागत व्हायला भाग्य लागतं!” असं कॅप्शन दिलं आहे. नेटकऱ्यांनी स्वप्नील जोशीच्या दोन्ही मुलांचं भरभरून कौतुक केलं आहे.

हेही वाचा : खेकडा खायला शिकविणारी स्पृहा जोशी ‘या’ कारणाने ट्रोल; नाराज नेटकरी म्हणाले, “तुला अनफॉलो…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वप्नीलने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “तुमच्या या गोड कुटुंबाला परमेश्वर सुखात ठेवो!”, “राघव-मायरा खूपच सुंदर”, “आज पाहिलेला सर्वात गोड व्हिडीओ” अशा कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, ‘वाळवी’ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे यांची जोडी प्रेक्षकांना लवकरच पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.