आज महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवारांच्या शपथविधीनंतर राज्यात दोन मुख्यमंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित अजित पवारांशी शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील बंडखोर आमदारांनीही शपथ घेतली.

“…आता महाराष्ट्रावर ‘राज’ करावं”, राजकीय परिस्थितीवर तेजस्विनी पंडितचं ट्वीट, नेटकरी म्हणाले “राज ठाकरे…”

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीदरम्यान मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीने ट्वीट केलं आहे. अजित पवारांच्या शपथविधीनंतर केलेल्या ट्वीटमध्ये “उत्तम पटकथा लिहिण्याची कला” असं स्वप्नील जोशी म्हणाला आहे. त्याचं हे ट्वीट सध्याच्या राजकीय परिस्थितीवर असल्याचं नेटकऱ्यांच्या कमेंट्सवरून दिसतंय. मात्र स्वप्निलने ट्वीटमध्ये राजकारणाबद्दल कोणताही उल्लेख केलेला नाही.

swapnil joshi
स्वप्नील जोशीचे ट्वीट

स्वप्नीलच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘साडेतीन वर्षात तीनदा मुख्यमंत्री’, ‘तुम्हाला संधी मिळाल्यास नक्की करा चित्रपट, सगळं आहे या चित्रपटात, मस्त बनेल चित्रपट’, ‘आता तुम्ही एका राजकारण्याची भूमिका करा’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

comments on swapnil joshi post
स्वप्निल जोशीच्या पोस्टवरील कमेंट

दरम्यान, अजित पवार यांच्याबरोबर धनंजय मुंडे, अदिती तटकरे, संजय बनसोडे असे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र एकूण किती आमदार सोबत आहेत, याबद्दलचा अधिकृत आकडा अद्याप अजित पवारांनी सांगितलेला नाही.