कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) भाष्य करणारा ‘दि एआय धर्मा स्टोरी’ हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच समाजमाध्यमांवर जाहीर करण्यात आली असून चित्रपटाचे नवीन पोस्टरही प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात अभिनेता पुष्कर जोगबरोबर अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि दीप्ती लेले मुख्य भूमिकेत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेल्या या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही पुष्कर जोगने केले असून बियू प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत.

हेही वाचा >>> “मी दिग्दर्शिकेचं लेबल स्वतःला लावून घेतलेलं नाही”, स्नेहल तरडेचं विधान, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुष्कर जोगने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वेगळे, नावीन्यपूर्ण चित्रपट दिले आहेत. त्यामुळे या चित्रपटातही प्रेक्षकांना काहीतरी नवीन अनुभवायला मिळणार. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात , ‘२५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा एक वेगळा विषय असून एका वडिलांची आणि मुलीची ही गोष्ट आहे. एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून वैयक्तिक सूड उगवण्याचा प्रयत्न करत एका मुलीचे अपहरण केले जाते. आपल्या मुलीला पुन्हा जिवंत पाहाण्यासाठी धोकादायक प्रवासाला निघालेल्या वडिलांची ही गोष्ट आहे. हॉलिवूडमध्ये ज्याप्रमाणे अॅक्शनदृश्यं असतात, तशीच या चित्रपटात पाहायला मिळणार असून एक नवा प्रयोग यातून करण्यात येत आहे.’