केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ३० जूनला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात वंदना गुप्ते यांनी साकारलेली भूमिका खूप गाजत आहे.

हेही वाचा- “मी हार मानणार नाही”; मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या चित्रपटाने आत्तापर्यंत तब्बल ५७.१५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला मिळणारे हे यश साजरे करण्यासाठी एका सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत वंदना गुप्तेंचे पती शिरीष यांनी त्यांच्या स्वभावाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा- वडील रवींद्र महाजनींच्या निधनाबद्दल गश्मीरची ‘ती’ पोस्ट शेअर करत मराठी अभिनेत्री म्हणाली…

पार्टीत केदार शिंदे यांनी शिरीष यांना विचारलं की “आम्ही सगळे वंदना ताईंना डॉन म्हणतो. तर घरात ती कशी असते?” यावर शिरीष म्हणाले की, “भलतेसलते प्रश्न विचारु नकोस. मला घरी जायचं आहे आणि शांत राहायचं आहे. घरात आम्ही दोघे अतिशय शांत असतो. तुम्ही सगळ्यांनी वंदनाचा आवाज ऐकलाच असेल ती किती शांत असते.” शिरीष यांच्या वाक्यावर उपस्थित सगळेच हसायला लागले.

हेही वाचा- ‘वडापाव’ चित्रपटाच्या सेटवर प्रसाद ओकच्या बायकोने केला खास पदार्थ; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे बजेट फक्त ५ कोटी होते, अशी माहिती एका वेबसाईटने दिली होती. बजेटच्या तुलनेत हा चित्रपट चार पटीने जास्त कमाई करताना दिसत आहे. ‘बाईपण भारी देवा’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता हा चित्रपट ‘सैराट’ आणि ‘वेड’ या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार असल्याचे बोललं जात आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस १२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाच्या कमाईत दुप्पटीने वाढ झाली.