‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित झाला. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत असून या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल होताना दिसत आहेत. या चित्रपटाचा सर्वजण भरभरून कौतुक करत आहेत. आता अशातच हा चित्रपट पाहिल्यानंतर वंदना गुप्ते यांनी त्यांच्या नवऱ्याची प्रतिक्रिया काय होती याचा खुलासा केला आहे.

हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची कथा आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.  तर अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी हा चित्रपट पाहिल्यावर त्यांच्या नवऱ्याची काय प्रतिक्रिया होती हे सांगितलं आहे.

आणखी वाचा : “आदेशने विवाहबाह्य संबंध ठेवले तर मी…”, सुचित्रा बांदेकरांचं उत्तर चर्चेत

View this post on Instagram

A post shared by Vandana Gupte (@vandanagupteofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी शिरीष यांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्यांना हा चित्रपट पाहणं शक्य झालं नाही. म्हणून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन-चार दिवसांनी वंदना गुप्ते त्यांचे पती शिरीष यांच्याबरोबर सिटीलाईट सिनेमाला संध्याकाळच्या शोला गेल्या होत्या. त्या म्हणाल्या, “चित्रपटगृहात महिला,पुरुष, लहान मुलं अशा सगळ्या वयोगटातील प्रेक्षक होते. माझ्या नवऱ्याला तो चित्रपट खूप आवडला. आता त्याला हा चित्रपट प्लाझामध्ये बघायचा आहे. हा चित्रपट पाहून झाल्यानंतर तो मला म्हणाला की, मला तुझ्याबद्दल वाटणारा आदर खूप वाढला आहे.”

हेही वाचा : अंकुश चौधरीच्या पत्नीचा ‘बाईपण भारी देवा’तील लूक आहे खूप खास, हातातल्या ब्रेसलेटमागे दडलाय मोठा अर्थ, घ्या जाणून

दरम्यान, या चित्रपटात वंदना गुप्ते यांनी साकारलेली भूमिका खूप गाजत आहे. या चित्रपटाने एका आठवड्यात १२.५० कोटींची कमाई केली. तर अजूनही या चित्रपटाची चित्रपटगृहात यशस्वी घोडदौड सुरू आहे.