अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक याचा कालच वाढदिवस झाला. यानिमित्त त्याच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजन सृष्टीतील त्याच्या अनेक मंडळींनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आता अशातच एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने प्रसादबद्दल केलेली पोस्ट खूप चर्चेत आली आहे. याआधी प्रसाद ओक याने ‘धर्मवीर’ चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. आता त्यापाठोपाठ तो स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारेल असं या पोस्टमुळे बोललं जाऊ लागलं आहे.

काल प्रसाद ओकसाठी दिग्दर्शक विजू माने यांनी त्याला शुभेच्छा देण्यासाठी एक खास पोस्ट केली. या पोस्टमध्ये विजू माने यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ते आणि प्रसाद ओक दिसत असून प्रसादच्या हातामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो असलेलं एक सीडी कव्हर दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना तू लवकरच त्यांच्या भूमिकेत दिसशील असं विजू माने म्हणाले.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”

आणखी वाचा : प्रसाद ओक व सई ताम्हणकरला हात जोडून मागावी लागली माफी, नेमकं प्रकरण काय?

विजू माने यांनी त्यांचा आणि प्रसादचा फोटो शेअर करत लिहिलं, “तुझ्या हातात असलेल्या सीडी कव्हरवर जो फोटो आहे तो रोल तू करणार आणि तो सिनेमा मी दिग्दर्शित करणार हे विधीलिखित लवकरच प्रत्यक्षात येवो ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा. (त्याआधी एक जोरदार मॅच प्रॅक्टिस होईलच)” आता त्यांची ही पोस्ट खूपच व्हायरल होत आहे. प्रसाद ओक आगामी काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसेल अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ‘हा’ अभिनेता सुरू करणार नवी इनिंग, झळकणार भाऊ कदम यांच्याबरोबर

या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचप्रमाणे “तुम्हाला या भूमिकेत पाहायला आवडेल,” असंही अनेक जण कमेंट करत म्हणाले आहेत. या चित्रपटावर विजू माने काम करत आहेत का हे त्यांनी सांगितलेलं नाही. त्याचप्रमाणे त्यांनी या पोस्टमधून कोणत्याही चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे प्रसाद ओक आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत कधी दिसणार हे पाहण्यासाठी त्याचे चाहतेही उत्सुक झाले आहेत.