केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. सहा अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने तब्बल ७६.०५ कोटींची कमाई करून मराठी कलाविश्वात नवा रेकॉर्ड केला. नुकताच हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. ओटीटीवर प्रदर्शित झाल्यापासून बॉलीवूडचे मोठमोठे स्टार्स व दिग्दर्शकांनी ‘बाईपण भारी देवा’ पहिल्यांदाच पाहिला. त्यामुळे प्रदर्शित होऊन जवळपास ८ महिने उलटल्यावरही या चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे. सध्या बॉलीवूडमधून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नुकताच ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यावर हे लोकप्रिय दिग्दर्शक एवढे भारावले की, त्यांनी थेट केदार शिंदे यांचं कौतुक करण्यासाठी खास पोस्ट लिहिली.

हेही वाचा : “त्यांना लहान केस आवडायचे नाहीत”, अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदाने केला खुलासा; म्हणाली, “माझे वडील नाराज…”

विवेक अग्निहोत्री लिहितात, “काल मी पहिल्यांदाच ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहिला. गेल्या काही दिवसांत एवढा सुंदर चित्रपट मी खरंच पाहिला नव्हता. हा चित्रपट ऑस्कर पात्र तर आहेच पण, बाईपणला राष्ट्रीय पुरस्कार तरी मिळालाच पाहिजे. सगळ्यांनी अतिशय दमदार काम केलेलं आहे. यात सगळ्यात मोठं श्रेय केदार शिंदे यांचं आहे. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी हा चित्रपट बनवला. टायमिंग, छोट्या छोट्या गोष्टींवर बारकाईने काम केलंय. माझ्याकडे खरंच शब्द नाहीत.”

हेही वाचा : वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी ‘अ‍ॅनिमल’ फेम रश्मिका मंदानाची मोठी कामगिरी! पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी

“रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा चौधरी तुम्ही कमाल आहात! तुमच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा आणि भविष्यात तुम्हाला आणखी यश मिळो एवढीच प्रार्थना! प्रेक्षकांना एकच सांगेन… हातातली सगळी कामं बाजूला ठेऊन एकदा तरी हा चित्रपट पाहा आणि मला नंतर धन्यवाद म्हणा!” अशी पोस्ट लिहित विवेक अग्निहोत्री यांनी ‘बाईपण भारी देवा’चे दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
kedar shinde
विवेक अग्निहोत्री यांची खास पोस्ट

दरम्यान, विवेक अग्निहोत्रींची ही स्टोरी रिशेअर करत “खूप खूप धन्यवाद सर” असं केदार शिंदे यांनी म्हटलं आहे.