चित्रपटाच्या जगातील किती तरी छोट्या गोष्टीत खूप खूप गंमत असते. आता हेच पहा ना चित्रपटाच्या नावात ‘दुनिया’ असणारा ‘दुनियादारी’ हा पहिला यशस्वी चित्रपट ठरला.
फार पूर्वी हिंदीत आसलेल्या ‘दुनियादारी’ चित्रपटाला रसिकांनी नाकारले. त्यात नूतन, विनोद मेहरा व बिंदिया गोस्वामी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘दुनिया’ नावाचा चित्रपट चक्क दोनदा अपयशी ठरला. पहिल्या वेळी त्यात देव आनंद आणि आशा पारेख यांच्या तर दुस-या वेळी ऋषी कपूर आणि अमृता सिंग यांच्या भूमिका होत्या. अगदी राजेश खन्नाचा ‘दिल दौलत और दुनिया’ देखिल रसिकानी नाकारला. आपल्या देशातला पहिला सत्तर एमएमचा चित्रपट ‘दुनिया की सैर’ देखिल अपयशी ठरला. ‘दुनिया ना माने’, ‘दिल और दुनिया’ असे किती तरी दुनियावाले पूर्णपणे अपयशी ठरले. फक्त ‘दुनियादारी’ तेवढा यशस्वी ठरला.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2013 रोजी प्रकाशित
‘दुनियावाला’ चित्रपट प्रथमच यशस्वी
चित्रपटाच्या जगातील किती तरी छोट्या गोष्टीत खूप खूप गंमत असते. आता हेच पहा ना चित्रपटाच्या नावात 'दुनिया' असणारा 'दुनियादारी' हा पहिला यशस्वी चित्रपट ठरला.
First published on: 27-08-2013 at 08:12 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi successful movie duniyadari