अभिनेते प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. प्रशांत दामले यांनी त्यांच्या विनोदीबुद्धीने प्रेक्षकांची मन जिंकली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच ते खवय्यांसाठीचे असलेले खास कार्यक्रम नेहमीच रंगवताना दिसतात. प्रशांत दामले हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते टीव्ही, नाटकाच्या जगतात प्रसिद्ध आहेत, तितकेच आपल्या खुमासदार पोस्टमुळे प्रसिद्ध आहेत.
नुकताच त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला कॅप्शन दिला आहे की, ‘भर पावसाळ्यात नवीन गॉगल घालुन काय आणि कस दिसत ते पहात होतो.. रिकामपणाचे बिनडोक उद्योग’. आपल्या नेहमीच्या विनोदीशैलीत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी देखील मजेशीर कॉमेंट्स केल्या आहेत.
‘मोरूची मावशी’ नाटक अन् ब्लॅकची तिकिटं, विजय पाटकर यांनी सांगितला होता प्रदीप पटवर्धन यांचा किस्सा
एकाने लिहले आहे की, भर उन्हाळ्यात स्वेटर घालून नाही पाहिला, नाहीतर आमच्या डोळ्यातून पाऊस पडला असता….हसता हसता, तर दुसऱ्याने लिहले की, ‘प्रशांतजी तुमच्यामुळे गाॕगल चांगलाच प्रसन्न दिसतोय…. लेन्स कार्ट’ अशा शब्दात त्यांची स्तुती केली आहे. ‘छान दिसत आहात सर, तरुण दिसत आहात’ असं बऱ्याच जणांनी कॉमेंटमध्ये सांगितले आहे.
प्रशांत दामले नुकतेच झी मराठीवरील किचन कल्लाकर या मालिकेत महाराज या भूमिकेत दिसले होते. किचन कलाकार या मालिकेत मराठीतले अनेक कलाकार येऊन गेले होते. त्यातील काही कलाकारांच्या पाककृतींनी प्रशांत दामले यांचे मन जिंकले होते. प्रशांत दामले सध्या वर्ष उसगावकर यांच्यासोबत ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकात दिसत आहेत. अनेक वर्षांनंतर ही जोडी रंगमंचावर दिसत आहे प्रेक्षक देखील त्यांच्या जोडीला पसंत करत आहेत.