राज्यातलं राजकारण गेल्या महिन्याभरापासून चांगलंच चर्चेत राहिलं. राज्यात सत्तांतर झालं आणि उद्धव ठाकरेंच्या जागी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. हे सत्तानाट्य सुरू असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा होती. पण झालं वेगळंच. तर असो. २०१९मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री असतानाचा ‘मी पुन्हा येईन’ हा डायलॉग चांगलाच गाजला होता. पण निकालानंतर मात्र, त्यांना विरोधी पक्षाच्या बाकावर बसावं लागलं. याच सगळ्या घटनाक्रमाचं कथन वेबसीरिजच्या रूपात प्रेक्षकांसमोर उभं राहणार आहे.
आणखी वाचा – वाघाची डरकाळी, रिक्षाचा हॉर्न अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संबंध काय? दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात…
प्रेक्षकांना विचार करायला लावणाऱ्या ‘मी पुन्हा येईन’ या राजकीय व्यंग असणाऱ्या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २९ जुलैपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रूचिता जाधव, भारत गणेशपुरे अशी स्टारकास्ट आहे. ट्रेलरमधील जबरदस्त संवाद, विनोदी किस्से प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारे आहेत.
पाहा व्हिडीओ