आमिर, शाहरुखनंतर आता अभिनेत्री अनुष्का शर्मा बॉलीवूडचा दबंग खान सलमानसोबत झळकणार आहे. सलमानच्या आगामी ‘सुलतान’ चित्रपटात अनुष्का त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसेल. यशराज फिल्म्सने यास दुजोरा दिला आहे.
२००८ साली बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने सलमानला मिठी मारलेला फोटो प्रसिद्ध केला असून त्यावर ‘सुलतान’ असे लिहले आहे.
👊🏼SULTAN👊🏼 pic.twitter.com/q54PWau1YG
— Anushka Sharma (@AnushkaSharma) January 8, 2016
आदित्य चोप्राची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अली अब्बास झफरचे आहे. कुस्तीपटूच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे चित्रीकरण कर्जत येथे होत आहे. कुस्तीपटूच्या भूमिका साकारण्यासाठी सलमानने कुस्तीचे खास प्रशिक्षण घेतले. तसेच, त्याने मिक्स मार्शल आर्टचेही धडे घेतले. या वर्षीच्या ईद दरम्यान ‘सुलतान’ प्रदर्शित होईल.