ब़ॉलीवूड असो वा साऊथ असे अनेक अभिनेते आहेत ज्यांच्या नावावर कोट्यावधीची संपत्ती आहे. एका चित्रपटासाठी कलाकार कोट्यावधी रुपयांचे मानधन घेतात. मानधन घेण्याच्या बाबतीत अनेक कलाकारांमध्ये चढाओढ सुरु असल्याची बघायला मिळते. अभिनयाशिवाय अनेक ब्रॅंड्स प्रमोशन करूनही भरपूर पैसे कमावतात. भारतात असा एक अभिनेता आहे ज्याची कमाई जवळपास ३१०० कोटी रुपयांची आहे. मात्र तरीही त्याला भारतातील सगळ्यात श्रीमंत अभिनेता मानले जात नाही. कोण आहे तो अभिनेता जाणून घेऊया…

नागार्जुन यांची संपत्ती किती?

हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून साऊथचा सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी आहे. नागार्जुन गेल्या चार दशकांपासून तेलगू इंडस्ट्रीत सक्रिय आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक सुपर-डुपर हिट चित्रपट दिले आहेत. या काळात त्यांनी अमाप संपत्तीही कमावली, पण ते देशातील सर्वात श्रीमंत अभिनेता बनू शकले नाहीत. फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या मते, तेलुगू सिनेमाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक असलेल्या नागार्जुन यांची संपत्ती $364 दशलक्ष म्हणजे अंदाजे रु. ३१०० कोटीपेक्षा जास्त आहे.

Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
first Indian woman who joined Unicorn Club
‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या
Transgender Success Story
लैंगिक शोषणाला बळी; पण न खचता बनली ती भारताची पहिली तृतीयपंथी सिव्हिल सर्व्हंट; वाचा ऐश्वर्याची यशोगाथा

नागार्जुन यांच्या कमाईचा स्त्रोत काय?

अभिनयाबरोबरच नागार्जुन यांचे अनेक व्यवसाय आहेत. या व्यवसायातून ते खोऱ्याने पैसे कमवतात. नागार्जुन यांचा स्वत:चा एक स्टुडियोही आहे, तसेच ते चित्रपटांची निर्मितीही करतात. एवढंच नाही तर ते एका रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शन फर्मचे प्रमुख आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नागार्जुन यांच्या मालकीच्या सर्व स्थावर मालमत्तेची किंमत सुमारे ८०० कोटी रुपये आहे.

हेही वाचा- ‘हीरामंडी’ : एक ‘शाही मोहल्ला’ की वेश्या व्यवसायाचं केंद्रस्थान? भन्साळींच्या आगामी सीरिजमागचा इतिहास जाणून घ्या

नागार्जुन यांना खेळाची आवड आहे. ते अनेक क्रीडा संघांचे मालक आहेत. यामध्ये इंडियन बॅडमिंटन लीगमधील मुंबई मास्टर्स, एफआयएम सुपरस्पोर्ट, वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील माही रेसिंग टीम इंडिया आणि इंडियन सुपर लीगमधील केरळ ब्लास्टर्स एफसी यांचा समावेश आहे. मोठमोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमधूनही ते बक्कळ पैसे कमवतात.

हेही वाचा- यामी गौतमनंतर रिचा चड्ढानेही दिली गुडन्यूज, अली फजलने शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

देशातील सगळ्यात श्रीमंत अभिनेता कोण?

नागार्जुन यांची एकूण संपत्ती ३१०० कोटींची असली तरी ते भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता बनू शकले नाही. नागार्जुन नाही, तर बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान भारतातील सगळ्यात श्रीमंत अभिनेता आहे. शाहरुखची एकूण संपत्ती जवळपास ६००० कोटी रुपये आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर हृतिक रोशनचा नंबर लागतो. हृतिक ३२०० कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे