मीरा राजपूत ही बॉलिवूडमधली सगळ्यात लोकप्रिय स्टार वाईफ्समधील एक आहे. लाइमलाइटपासून दूर असली तर लाखोंच्या संख्येने तिचे चाहते आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टसाठी तिचे चाहते उत्सुक असतात. शाहिद कपूरसोबतच त्याचा छोटा भाऊ ईशान खट्टरसोबत सुद्धा वहिणी मीरा राजपूत-कपूरचे चांगलं बॉण्डिंग असल्याचं समोर अनेकदा आलंय. ते दोघेही एकमेकांसोबतचे फोटोज नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतात. ही दीर-वहिणीची जोडी नेहमीच एकमेकांवर विनोद करताना देखील दिसून आले. नुकतंच मीराने दीर ईशानसोबतचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये सुद्धा दोघांमधील स्ट्रॉंग बॉण्डिंग दिसून आली.
मीरा राजपूत-कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा दीरासोबतच फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये दीर ईशान वहिणी मीराला गोड मिठी मारताना दिसून आला. या दोघांचाही क्यूट फोटो चाहत्यांना खूपच आवडलाय आणि फोटोवर प्रतिक्रिय देताना दिसून येत आहेत. मीराने हा फोटो शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहिलीय. ‘प्लेग्रूप’ असं तिने या कॅप्शनमध्ये लिहिलंय. यासोबत तिने फनी इमोजी जोडलेली आहे.
View this post on Instagram
मीराने शेअर केलेल्या या फोटोवर दीर ईशानने सुद्धा कमेंट केली आहे. यात त्याने वहिणी मीराला ‘भाभी डॉल’ असं म्हटलंय. दोघांच्या या फोटोला ३ लाख २५ हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. ‘देवा…दोघे किती क्यूट दिसत आहेत’, असं लिहित एका युजरने त्यांच्या फोटोवर कमेंट केली आहे. तर आणखी युजरने ‘क्यूटेस्ट दीर-वहिणीची जोडी’ असं म्हटलंय. मीरा आणि ईशानच्या दीर-वहिणीच्या या फोटोवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.