scorecardresearch

मिर्झापुर ३ साठी अभिनेत्री श्वेता त्रिपाठीची कसून मेहनत, गोलू ३.० चा व्हिडिओ होतोय व्हायरल

नुकताच श्वेताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर जीममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

मिर्झापुर ३ साठी अभिनेत्री श्वेता त्रिपाठीची कसून मेहनत, गोलू ३.० चा व्हिडिओ होतोय व्हायरल
श्वेता त्रिपाठी मिर्झापुर | Shweta Tripathi Mirzapur

अॅमेझॉन प्राईमवरील सर्वात लोकप्रिय भारतीय वेबसिरिज म्हणजे मिर्झापुर. या सिरिजची लोकप्रियता आणि चाहतावर्ग फारच मोठा आहे. लॉकडाऊन दरम्यान या सिरिजचा दूसरा सीझन रिलीज झाला होता. तेव्हा या दुसऱ्या सीझनसाठी सगळेच चाहते चातकाप्रमाणे वाट बघत होते. पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, अली फजल, विक्रांत मस्से, रसिक दुग्गल, कुलभूषण खरबंदा, श्वेता त्रिपाठी, श्रीया पिळगांवकर अशा कलाकारांना घेऊन बनलेल्या या सिरिजने भारतीय प्रेक्षकांवर गारुड केलं आहे. यातली सगळीच पात्र लोकांच्या फार आवडीची आहेत.

त्यापैकीच एक दमदार आणि धाडसी पात्र म्हणजे गोलूचं, आणि हे पात्र साकारलं आहे अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने. श्वेताने मसान आणि हरामखोरसारख्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमातून काम केलं आहे. मसानमध्ये तिच्या कामाची खरी दखल घेतली गेली. त्यानंतर आलेल्या मिर्झापुरने मात्र तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं आहे. खासकरून या सिरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये गोलू हे पात्र आणि तिचं महत्व जास्त अधोरेखित झालं आहे.

अभिनेता अली फजल साकारत असलेल्या गुड्डू भैय्या या पात्राच्या तोडीस तोड गोलूचं पात्र आहे. प्रेक्षक आणि खासकरून मिर्झापुरचा चाहतावर्ग तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट बघत आहेत. कित्येक फॅन मेड थिअरीजसुद्धा आपण ऐकल्या आहेत. तिसऱ्या सीझनमध्ये हे नाट्य आणखीन किती गडद होणार याचीच सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. तिसऱ्या सीझनसाठी गोलू म्हणजेच श्वेता त्रिपाठी सध्या भरपूर मेहनत घेत आहे. नुकताच श्वेताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर जीममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये श्वेता गोलू या पात्रासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. शिवाय पोस्ट शेयर करताना तिने ‘गोलू ३.० मिर्झापुर ३ साठी सज्ज’ असं लिहिलं आहे. तिच्या एकंदर मेहनतीकडे बघून आगामी सीझनमध्ये गोलू हे पात्र खंबीर आणि धाडसी दाखवणार आहेत याचा अंदाज आला आहे. या सिरिजच्या माध्यमातून श्वेताची एक स्वतःची ओळख निर्माण झाली आहे. ती ओळख टिकवून ठेवण्यासाठीच श्वेता एवढी मेहनत घेतीये हे स्पष्ट होत आहे.

अ‍ॅमेझॉनकडून ‘मिर्झापूर ३’ची घोषणा

मिर्झापुर ही सिरिज पूर्णपणे काल्पनिक असली तरी काही काही घटना आणि पात्र या वास्तवाशी मिळत्या जुळत्या वाटू शकतात. गुन्हेगारी तसेच राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या सिरिजचे चित्रीकरण फार वास्तवदर्शी पद्धतीने केले गेले आहे. मिर्झापुरच्या तिसऱ्या सीझनचं शूटिंग सुरू झालेलं आहे आणि यावर्षभरात हा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mirzapur fame shweta tripathi extreme workout video viral avn

ताज्या बातम्या