Abhishek Bachchan is scared of wife Aishwarya Rai Bachchan : ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री जया बच्चन यांच्या व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. जया फोटोग्राफर्सना ओरडताना दिसतात. प्रेक्षकांना वाटेल की, जया बच्चन घरातील सदस्यांशी खूप कडक वागतात आणि कदाचित अभिषेक बच्चन त्यांना खूप घाबरत असतील.

पण अभिषेकची बहीण श्वेता बच्चनच्या मते, प्रकरण काही वेगळेच आहे. कॉफी विथ करणमध्ये श्वेता बच्चनने तिचा भाऊ अभिषेकबद्दल असे काही सांगितले की, चाहत्यांना हसणे थांबवणे कठीण झाले.

अभिषेक कोणाला घाबरतो- त्याची पत्नी की त्याची आई?

करण जोहरने आयोजित केलेल्या ‘कॉफी विथ करण’ या रिअ‍ॅलिटी टॉक शोमध्ये अभिषेक बच्चन आणि त्याची बहीण श्वेता बच्चन एकत्र असताना, संभाषणादरम्यान एक मजेदार गोष्ट समोर आली. आता ही जुनी क्लिप पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रॅपिड फायर राउंडदरम्यान, करण जोहरने अभिषेक बच्चनला असे काही विचारले की, जे त्याने कधीच अपेक्षित केले नव्हते. करण जोहरने विचारले, “तुला सर्वांत जास्त कोणाची भीती वाटते, तुझी पत्नी की आई?” अभिषेकने उत्तर दिले- आई.

बहीण श्वेता बच्चन काय म्हणाली?

पण, श्वेता बच्चनने लगेच हस्तक्षेप केला आणि म्हणाली, “त्याला सर्वात जास्त भीती त्याची आई नाही तर ऐश्वर्याची वाटते.” अभिषेक बच्चनला त्याच्या बहिणीचे उत्तर आवडले नाही आणि तो कडक आवाजात म्हणाला- हा माझा रॅपिड फायर आहे; तू गप्प राहा. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचे नाते काही दिवसांपासून इंटरनेटवर खूप चर्चेत होते. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात काही ठीक नाही आणि दोघांमध्ये वेगळे होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा होती. कालांतराने या सर्व गोष्टी केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आणि अभिषेक-ऐश्वर्या एकत्र दिसले.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायने बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी २००७ मध्ये लग्न केलं आणि २०११ मध्ये आराध्या बच्चनचा जन्म झाला. त्यांच्या लग्नाला १७ वर्षे झाली आहेत.

लग्नापूर्वी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसलेत. दोघांचा ‘गुरू’ हा चित्रपट अजूनही चर्चेत आहे. त्याशिवाय ‘ढाई अक्षर प्रेम के’, ‘धूम 2’, ‘कुछ ना कहो’ अशा अनेक चित्रपटांमध्ये या जोडप्यानं धमाल केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.