अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नाम्बियार यांचं लग्न सोशल मीडियावर बरंच चर्चेत राहिलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अद्याप सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अशात आता या दोघांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मौनी आणि सूरज धम्माल डान्स करताना दिसत आहेत. दोघांच्याही स्टायलिश लूकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ मौनी आणि सूरज यांच्या लग्नाआधीच्या एका फंक्शनमधील आहे. ज्यात टीव्ही सेलिब्रेटी हातात शॅम्पेन घेऊन पूल पार्टी करताना दिसत आहेत. यावेळी सूरज आणि मौनी यांनीही बॉल डान्स केला होता. मौनी आणि सूरज यांच्या या हॉट डान्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. एवढंच नाही तर अर्जुन बिजलानी आणि अभिनेत्री मंदिरा बेदी हे देखील या व्हिडीओमध्ये धम्माल करताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मौनी रॉयनं तिच्या इन्स्टाग्रामवर लग्न आणि त्याआधीच्या वेगवेगळ्या फंक्शनचे बरेच फोटो शेअर केले आहेत. मौनीनं हा व्हिडीओ देखील तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिलं, ‘माय बंच ऑफ फूल्स’. याशिवाय मौनीनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेले हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर बरेच चर्चेत होते.