छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मौनी रॉयने बॉयफ्रेंड सूरज नांबियारशी लग्न केले. त्यांच्या लग्नातील खास फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर आता मौनीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती चक्क बार काऊंटरवर चढून नाचत असल्याचे दिसत आहे.
मौनी आणि सूरजने एक पोस्ट वेडिंग पार्टी आयोजित केली होती. या पार्टिला मित्र परिवार आणि कुटुंबातील सदस्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. या पार्टीमधले काही व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. एका व्हिडीओमध्ये मौनी तिच्या गर्ल गँगसोबत बार काऊंटवर उभी राहून डान्स करत असल्याचे दिसत आहे.
‘पुष्पा’च्या यशानंतर श्रेयसचा नवा प्रोजेक्ट, दिसणार ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत
मौनी रॉयच्या लग्नाला अनेक कलाकरांनी हजेरी लावली. यामध्ये मंदिरा बेदी, आशका गोराडिया, मनमीत सिंह आणि त्याची पत्नी, अर्जुन बिजलानी, ओमकार कपूर आणि इतर कलाकारांनी हजेरी लावली.
मौनी आणि सुरज हे गोव्यात लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नातील पहिला फोटो मौनीचा जवळचा मित्र अर्जुन बिजलानीने सोशल मीडियावर शेअर केला होता. लग्नाआधी होणारे सगळे कार्यक्रम देखील तिथेच पार पडले. मौनी आणि सुरजच्या हळदी आणि मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यांच्या या प्रीवेडिंग कार्यक्रमांमध्ये मंदिरा बेदी, अर्जुन बिजलानीसोबत आणखी बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.