अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत असलेला ‘शेरशाह’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट १२ ऑगस्ट रोजी अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सिद्धार्थने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली असून यासाठी सिध्दार्थला संपूर्ण बॉलिवूडमधून कौतुकाची थाप मिळताना दिसत आहे. अशात त्याच्या एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्टने देखील त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

सिद्धार्थने अयशस्वी चित्रपटांची एक श्रृंखला अनुभवली आहे. त्यामुळे ‘शेरशाह’ हा चित्रपट सिद्धार्थसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याची मेहनत आणि त्याच्या अभिनय कौशल्यामुळे त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड आलियाने देखील हा चित्रपट पाहिला असून तिने सिद्धार्थचं कौतुक केलंय. आलियाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. तिने शेरशाह चित्रपटातला एक व्हिडीओ तिच्या स्टोरीमध्ये शेअर करत लिहिले की,”नक्की बघा! या चित्रपटाने मला हसवले, रडवले आणि सगळं काही…” या स्टोरीत सिद्धार्थला टॅग करत “तू खुपच छान काम केलं आहेस, कियारा तु पण खूप सुंदर काम केलं आहेस. संपूर्ण टीमला शुभेच्छा, खूप छान चित्रपट आहे.” या चित्रपटात कियारा आडवाणीने विक्रम बत्रा यांच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. सिध्दार्थ बरोबरचं तिच्या भूमिकेला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

aliya
Photo-Alia Bhat Instagram Story

‘शेरशाह’या चित्रपटाद्वारे १९९९ सालातील कारगीलच्या युद्धात त्यांनी दिलेल्या बलिदानाला मानवंदना देण्यात येत आहे. आपले ‘शेरशाह’हे नाव सार्थ करत कॅप्टन बत्रा यांनी दिलेला साहसी लढा आणि सरते शेवटी केलेले बलिदान भारताच्या विजयामध्ये महत्त्वाचे ठरले होते. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीसोबत शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोप्रा देखील म्हातावची भूमिका सकरतान दिसतील.

‘स्टूडंट ऑफ द इअर’च्या दरम्यान आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राची ओळख झाली आणि मग प्रेमात रूपांतर झाले. काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्या नंतर सामंजस्याने ते दोघे वेगळे झाले. वेगळे झाले असले तरीही मात्र त्या दोघांमध्ये आजही खूच चांगली मैत्री आहे. ते दोघेही कायम एकमेकांना सपोर्ट करत असतात. आलियाने शेअर केलेली  ही स्टोरी पाहून ते दोघे किती छान मित्र-मैत्रीण आहेत हे दिसून आले.