संपूर्ण जगभरात आज मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे स्वागत केले जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांपासून ते सामन्य माणसांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. अंबानी परिवानेदेखील बाप्पाच्या येण्याची जोरदार तयारी केली आहे. अंबानी यांचे घर अॅन्टीलिया येथे मोठ्या प्रमाणावर रोशनाई करण्यात आली असून बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी करण्यात आली असल्याचे दिसत होते.
यंदाचा गणेशोत्सवर अंबानी परिवासाठी खास आहे. कारण ईशा अंबानी- आनंद पीरामल आणि आकाश अंबानी- श्लोका मेहता यांच्या लग्नानंतर हा पहिला गणेशोत्सवर आहे. त्यामुळे अंबानी परिवार मोठ्या धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करणार आहे. अॅन्टीलिया येथील सजावटीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अॅन्टीलियाजवळील रोशनाई दिसत आहे. या विद्युत रोषणाईच्या झगमगाटाने डोळे दिपून जात आहेत.
View this post on Instagram
Decoration outside #antila for #mukeshambani #nitaambani #ganpati #ganpatifestival2019 @viralbhayani
काही दिवसांपूर्वी गणेश चतुर्थीचे आमंत्रण देण्यासाठी अंबानी परिवाने स्पेशल कार्ड छापले. या कार्डमध्ये अंबानी परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या असून सर्वांना बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अंबानी परिवाराने आमंत्रण दिले आहे. दरम्यान बाप्पाची आरती ९ वाजता केली जाणार असल्याचेदेखील म्हटले आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ईशा अंबानी आणि आनंद पीरामल विवाहबंधनात अडकले. त्यांचा विवाहसोहळा मुंबईमध्येच पार पाडण्यात आला होता. दरम्यान ईशाने प्रसिद्ध ड्रेस डिझायनर संदीप खोसलाने डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. मार्च महिन्यात ईशाचा भाऊ आकाश अंबानीने देखील श्लोका मेहताशी लग्न केले. दोन्ही बहिण भावांच्या लग्नांना बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना आमंत्रण देण्यात आले होते.