मुमताज त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जातात. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला दारा सिंहबरोबर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होते; परंतु हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना बी ग्रेड अभिनेत्रीचा टॅग देण्यात आला होता. त्यामुळे अनेक ए लिस्टेड कलाकारांनी त्यांच्याबरोबर काम करण्यास नकार दिला होता. परंतु, दिलीप कुमार यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि ‘राम और श्याम’ (१९६९) या त्यांच्या चित्रपटात त्यांना कास्ट करण्याचा निर्णय घेतला.

‘रेडिओ नशा’ला दिलेल्या मुलाखतीत मुमताज यांनी दिलीप कुमार यांचे आभार मानले. त्यांनी असेही उघड केले की, दिलीप कुमार त्यांच्या चित्रपटांमध्ये स्वतःचे डायलॉग्स स्वतः लिहीत असत आणि ते कधीही इतरांनी लिहिलेले डायलॉग्स बोलत नव्हते. मुमताज यांनी सांगितले की, मेहमूद यांनी त्यांची दिलीप कुमार यांच्याशी कशी ओळख करून दिली आणि ‘राम और श्याम’मध्ये काम मिळवून देण्यासाठी दिलीप कुमार यांना त्यांची रीळ कशी दाखवली.

मुमताज म्हणाल्या, “दिलीप कुमार यांनी रीळ पाहिली आणि सांगितले की, ती खूप सुंदर आहे आणि डान्सही चांगले करते. मी तिच्याबरोबर चित्रपट करीन. मी त्यांची खूप आभारी आहे. जेव्हा त्यांनी माझ्याबरोबर चित्रपट करण्यासाठी हो म्हटले तेव्हाच मी अभिनेत्री होऊ शकले. जर त्यांनी नकार दिला असता, तर मी कधीही अभिनेत्री बनू शकले नसते.”

त्या पुढे म्हणाल्या की, त्यावेळी दिलीप कुमार यांनी त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर कलाकारांनीही त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. मुमताज म्हणाल्या, “जेव्हा त्यांनी माझ्याबरोबर चित्रपट करण्यास होकार दिला तेव्हा इतर कोणीही नकार दिला नाही. त्यानंतर सर्वांनी माझ्याबरोबर काम केले.”

“दिलीप कुमार स्वतः लिहिलेले डायलॉग्स बोलत असत”

मुमताज यांनी दिलीप कुमार यांच्याशी संबंधित एक मनोरंजक गोष्टदेखील सांगितली. त्या म्हणाल्या, “ते स्वतःचे डायलॉग्स स्वतः लिहायचे आणि जोपर्यंत दिग्दर्शक आग्रह करीत नव्हता तोपर्यंत ते दुसऱ्याने लिहिलेले डायलॉग्स कधीच बोलत नव्हते.” मुमताज म्हणाल्या की, सर्व चित्रपटांमध्ये दिलीप कुमार यांची काम करण्याची हीच स्टाईल होती.

मुमताज यांना बी ग्रेड अभिनेत्रीचा टॅग देण्यात आला होता

यापूर्वी डॉन न्यूजशी बोलताना, मुमताज यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्या भूमिकांबद्दल फारशी निवडक का नव्हत्या हे स्पष्ट केले होते. त्या म्हणाल्या, “मला बी ग्रेड अभिनेत्रीचा टॅग देण्यात आला होता. कारण- मी खूप लहान भूमिका केल्या होत्या. मी मेहबूब साहेबांबरोबर कॉमेडीदेखील केली. मी फक्त डोळे बंद करून काम करीत राहिले. मला वाटले की बाकीचे देवाच्या हातात आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुमताज यांचे ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर’ हे प्रसिद्ध गाणे आहे. मुमताज यांनी राजेश खन्नाबरोबरदेखील अनेक हिट चित्रपट दिले होते.