‘चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शकाचे नाव सांगा आणि सोन्याचे नाणे जिंका’, निर्मात्यांनी केली अनोख्या स्पर्धेची घोषणा

त्यांनी १९९९ नंतर आतापर्यंत एकाही चित्रपटाची निर्मिती केलेली नाही.

आपला चित्रपट हिट व्हावा यासाठी कोण काय युक्ती करेल याचा काहीही नेम नाही. तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांपैकी एक अशी के. टी. कुंजुमन यांची ओळख आहे. नुकतंच त्यांनी त्यांच्या आगामी ‘जेंटलमन 2’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी एका स्पर्धेचेही आयोजन केले आहे. के.टी. कुंजुमन यांनी ट्विटरवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

के. टी. कुंजुमन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांनी नुकतंच जेंटलमन २ या चित्रपटाची घोषणा केली आहे. याबाबत ट्वीट करताना त्यांनी एका स्पर्धेचीही माहिती दिली आहे. आमच्या आगामी चित्रपटाचा संगीत दिग्दर्शकाच्या नावाचा अचूक अंदाज लावा. तुम्ही तुमचे उत्तर ट्विटरवर #G2MusicDirector हा हॅशटॅग वापरत शेअर करा. यातील ३ भाग्यवान विजेत्यांना प्रत्येकी एक सोन्याचे नाणे दिले जाईल, असे त्यांनी यात म्हटले आहे.

दरम्यान शनिवारी या स्पर्धेची घोषणा केल्यानंतर रविवारी त्यांनी ट्वीट करत याचे उत्तरही जाहीर केले आहे. तामिळ चित्रपट निर्माते के.टी. कुंजुमन यांच्या आगामी ‘जेंटलमॅन २’ या चित्रपटासाठी भारतातील सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकांपैकी एक एम एम कीरावानी संगीत देणार आहेत.

के. टी. कुंजुमन यांनी त्या संगीत दिग्दर्शकाचा सन्मान करतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्याला कॅप्शन देताना ते म्हणाले की, “मी अभिमानाने घोषणा करु इच्छितो कीभारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी हे ‘जेंटलमन 2’ साठी संगीत दिग्दर्शक असतील”, असे त्यांनी यात म्हटले आहे.

के. टी. कुंजुमनने अनेक तामिळ चित्रपटांची निर्मिती केली आहे. विनीत आणि अब्बास यांच्यासोबत प्रभू देवा यांची प्रमुख भूमिका ‘कधालन’ आणि ‘कधल देशम’ हा त्यांचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट आहे. सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांमध्ये याचा समावेश होतो.

चित्रपट निर्माते के.टी. कुंजुमन यांनी १९९९ नंतर आतापर्यंत एकाही चित्रपटाची निर्मिती केलेली नाही. त्यानंतर आता त्यांनी नुकतंच पदार्पण करण्याची घोषणा करताना ते म्हणाले की, मी लवकरच ‘जंटलमन’चा सिक्वेल बनवणार आहे. सध्या ‘जंटलमन 2’ या चित्रपटाचे सर्व निर्माते निर्मितीमध्ये व्यस्त आहेत. मात्र हा चित्रपट बनवणाऱ्या कोअर टीमच्या सदस्यांची नावे जाहीर करण्यापूर्वी अशी स्पर्धा घेण्याचा विचार आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Music director mm keeravani to produce music for k t kunjumon gentleman 2 movie nrp

Next Story
Video : ‘पुष्पा’तील सामी सामी गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींनी केला भन्नाट डान्स
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी