बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने केलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. आता लवकरच तो आपल्या नव्या लूकमध्ये दिसणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी ‘हड्डी’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. निर्मात्यांनी या चित्रपटातून नवाजुद्दीन सिद्दीकीची पहिली झलक दाखवली आहे, जी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. त्याच्या या लूकने सर्वांनाच थक्क केले आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीचा आगामी ‘हड्डी’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यातून चित्रपटाच्या प्रदर्शनाचीही माहिती मिळाली. हा चित्रपट पुढच्या वर्षी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओने मोशन पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये नवाझ स्त्रीवेषात दिसला आहे. पहिल्यांदा हे पोस्टर पाहताना नवाझ ओळखू येत नाही.

‘बरं झालं मला घेतलं नाही… ‘ अनुपम खेर यांनी सांगितला ‘त्या’ भूमिकेचा किस्सा

अभिनेत्याचा मेकअप इतका उत्तम आहे की त्याला ओळखणे कठीण जात आहे. मेकअप आर्टिस्टने अप्रतिम काम केले. पोस्टरमध्ये नवाजुद्दीनचे हात रक्ताने माखलेले दिसत आहेत. यासोबतच त्याने रक्ताने माखलेले धारदार शस्त्र ठेवले आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरून नवाझच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर मात्र नेटकरी या पोस्टरची खिल्ली उडवताना दिसत आहेत. एकाने लिहले आहे की, ‘मला पोस्टर पाहून अर्चना पुरण सिंग वाटली’ तर एकाने लिहले आहे की, ‘ही अर्चना पूरण सिंहसारखी दिसत नाही का’? तर दुसर्‍याने लिहिले की ‘कदाचित तुम्ही अर्चना पूरण सिंहला टॅग करायला विसरलात’. नवाझ मात्र पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत दिसणार हे नक्की. गँग्स ऑफ वासेपूर, बदलापूर, रमण राघव यासारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत.