न्यूयॉर्कमध्ये सोमवारी रात्री ४९वा आंतराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कारांसाठी भारतातील नवाजुद्दीन स‍िद्दिकी, सुष्‍मिता सेन आणि वीरदासला वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी नामांकन मिळालं होतं. मात्र असं असलं तरी या सोहळ्यात भारताच्या पदरी निराशा पडली आहे. या तिघांनाही एकही पुरस्कार मिळालेला नाही.

या पुरस्कार सोहळ्यासाठी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी न्यूयॉर्कला गेला होता. मात्र पुरस्कार न मिळाल्याने तो काहीसा निराश झालाय. असं असलं तरी त्याने आशा सोडलेली नाही. या पुरस्कारासाठी पुन्हा प्रयत्न करण्याचं त्याने ठरवलं आहे. नुकतेच नवाजने काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यावेळी त्याने काव्यात्मक अंदाजात भावना व्यक्त केल्या आहेत. पोस्टमध्ये तो म्हणाला, “फूलों में फूल,फूल है गुलाब…न्यूयॉर्क तो चले गए, बन ना पाए नवाब, कोशिश जारी रहेगी… आदाब” ही पोस्ट शेअर करत नवाब प्रयत्न सुरुच ठेवणार असल्याचं म्हंटलंय.

“सून मला घरी बसूच देत नाही”; कपिल शर्माच्या आईने गिन्नीबद्दल केला खुलासा

तर आणखी एक पोस्ट शेअर करत नवाज म्हणाला, “सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो…तुम्हाला हवं ते करा पण सर्वोत्तम करा” अशा आशयाची पोस्ट त्याने केलीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटफ्लिक्सवरील ‘सिरियस मेन’ सिनेमासाठी नवाजला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत नामांकन मिळालं होतं. मात्र हा पुरस्कार अभिनेता डेव्हिड टेनंट याने पटकावला.एमी पुरस्कार सोहळ्यात सुष्मिता सेनला ‘आर्या’ या वेब सीरिजसाठी नामांकन मिळालं होतं. तर अभिनेता वीरदासलाही नामांकन मिळालं होतं. या पुरस्कार सोहळ्यात एकूण २४ देशातील विविध कलाकारांना नामांकन मिळालं होतं.