अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने सलमान, शाहरूख व आमीर या खान त्रयींकडून प्रेरणा मिळाल्याचे म्हटले आहे. या तीनही दिग्गज अभिनेत्यांसोबत त्याने काम केले आहे.
येत्या १७ जुलैला सलमान खानचा बजरंगी भाईजान चित्रपट प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात नवाजने एका पाकिस्तानी पत्रकाराची भूमिका केली आहे. आमीर खानच्या तलाश या चित्रपटातून नावाजलेल्या नवाजने त्यानंतर राहूल ढोलकिया दिग्दर्शित रईस या चित्रपटात शाहरूख खानसबोत अभिनय केला. यापूर्वी नवाजने कीक या चित्रपटात खलनायकाची भूमिका बजावली होती, याच चित्रपटात सलमानने नायकाची भूमिका बजावली होती, इथेच सलमान व नवाझ यांचे चांगले जमल्याने त्याला ‘बजरंगी भाईजान’ने आपल्या चित्रपटात अभिनय करण्याची पुन्हा संधी दिली. नवाज गंभीर अभिनय करत असल्याचे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत असून काही विनोदी दृश्यही आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jul 2015 रोजी प्रकाशित
बॉलिवूडमधील खान त्रयींमुळे नवाजुद्दीन सिद्दिकीला प्रेरणा
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने सलमान, शाहरूख व आमीर या खान त्रयींकडून प्रेरणा मिळाल्याचे म्हटले आहे.

First published on: 09-07-2015 at 05:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui highly inspired by bollywood khan trio aamir srk and salman