बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ऑटोबायोग्राफीमुळे चर्चेत आहेत. ‘सच कहूं तो’ असे या ऑटोबायोग्राफीच नावं आहे. या पुस्तकात नीना यांनी त्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्याबद्दल कोणाला ही काही माहित नव्हते. त्यापैकी एक म्हणजे नीना यांचे खूप कमी वयात लग्न झाले होते आणि हे लग्न फक्त वर्षभर टिकले होते.
नीना यांनी त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल त्या पुस्तकात खुलासा केला आहे. नीना यांनी अमलन कुसुम घोष नावाच्या व्यक्तीशी लग्न केले होते. अमलन त्यावेळी आयआयटीमध्ये शिकत होते आणि नीना गुप्ता या संस्कृतमध्ये मास्टर्स करत होत्या. “अमलन आणि मी कॅम्पस, हॉस्टेल आणि माझ्या घराजवळ गपचूप भेटायचो. त्यांचे आई-वडील दुसर्या शहरात राहत होते. पण त्यांचे आजोबा माझ्या गल्लीत राहायचे, म्हणून ते सण आणि सुट्टीच्या दिवशी त्यांच्याकडे येत होते,” असे नीना म्हणाल्या.
नीना यांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कोणालाच सांगितले नव्हते. मात्र, त्यांच्या एका मैत्रिणीने नीना यांच्या आई-वडिलांना या बद्दल सांगितले होते. यानंतर नीना आणि अमलन यांच्या रिलेशनशिपवर याचा काही फरक पडला नाही. दरम्यान, नीना यांना अमलनसोबत श्रीनगरला जाण्याची परवाणगी देखील मिळाली होती कारण त्या दोघांनी लग्न केले होते.
आणखी वाचा : Indian Idol 12: ‘त्येकवेळी ड्रामा करणं बंद करा’,नेहा कक्कर आणि हिमेश रेशमीया झाले ट्रोल
पुढे अमलनसोबत त्यांचे लग्न कसे मोडले हे सांगताना नीना म्हणाल्या, “अमलन या सगळ्या गोष्टींकडे वेगळ्या प्रकारे पाहत होते. मला नेहमी वाटायचं की आम्ही सेटल होऊ आणि आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करू. पण कदाचित मी खूप महत्वाकांक्षी झाली होती आणि मी स्वत: कडे एक गृहिणी म्हणून कधी पाहिलेच नव्हते. मला आणखी अनेक गोष्टी पाहिजे होत्या. त्यानंतर जेव्हा मी नाटकात काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा मला माझा खरा मार्ग समजला.”
View this post on Instagram
नीनाने पुढे म्हणाल्या, “माझं आणि अमलनचं लग्न फार कमी वेळ टिकलं. मात्र, त्या काळात आम्ही फारसं भांडलो नाही. दैनंदिन जीवनाबद्दल, आमच्या घरात असलेल्या गोष्टी किंवा माझा अभ्यास कसा सुरु आहे याबद्दल आमच्यात कधी वाद झाला नाही. आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही दोघे खूप लहान होतो. तरीही मला अमलन विरोधात कोणतीही तक्रार नाही.”
आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य
एका वर्षातच नीना आणि अमलन विभक्त झाले. नीना आणि अमलन विभक्त झाल्यानंतर नीना या वेस्ट इंडिज क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. विवियन रिचर्ड्स आणि नीना यांची एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचे नाव मसाबा आहे. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी नीना यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केले आणि आता त्यांच्या लग्नाला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत.