बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. नीना या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच नीना यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी महिलांना त्यांच्या कपड्यांवरून बोलणाऱ्यांना फटकारले आहे. नीना यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ नीना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत नीना बोलतात, हा व्हिडीओ पोस्ट करण्याची गरज मला या कारणामुळे वाटली की “काही लोक असतात जे सेक्सी कपडे परिधान करतात, जसे की मी परिधान केले आहे. ते लोक बेकार असतात असे अनेक लोक बोलतात. पण मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे की मी संस्कृतमध्ये शिक्षण घेतले आहे आणि इतर अनेक गोष्टी शिकल्या आहेत. यामुळेच कधीच कपडे पाहून कोणा विषयी तुमचं मत तयार करू नका. ट्रोल करणाऱ्यांनी समजून घ्या”, असे बोलतात.

आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video

आणखी वाचा : “प्रसिद्ध व्यावसायिकाने मला त्याच्या पत्नीसोबत रात्र…”, तेहसीन पुनावालाने केला धक्कादायक खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नीना या सगळ्यात शेवटी ‘८३’ या चित्रपटात दिसल्या. या आधी त्या सरदार का ‘ग्रॅंड सन’, ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या. या व्यतिरिक्त त्यांनी ‘मसाबा मसाबा’ या वेब सीरिजमध्ये ही काम केले आहे. तर लवकरच नीना या अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गूडबाय’ या चित्रपटात दिसणार आहेत.