अभिनेत्री नीना कुलकर्णींची मुलगी काय करतेय माहितेय ?

‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत शिवबांना धडे देणाऱ्या अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या खऱ्या आयुष्यातील मुला-मुलीबद्दल आम्ही आज सांगणार आहोत.

neena-kulkarni-family-and-her-daughter
(Photo:Instagram/neenakulkarni)

नीना कुलकर्णी जिजाऊंच्या भूमिकेत स्वराज्याचा राजा घडवण्यासाठी जिजाऊ शिवबांना न्यायाचे, शास्त्राचे आणि धर्माचे धडे देताहेत. पण खऱ्या आयुष्यात नीना कुलकर्णी यांनी त्यांच्या मुलीलाही अगदी तसंच घडवलंय. होय, आज आम्ही सांगणार आहोत अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या मुलीबद्दल….

सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या मालिकेद्वारे महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षकांना पहायला मिळतोय. यात मालिकेत जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री नीना कुलकर्णींना पाहणं ही खरं तर एक पर्वणी आहे. नीना कुलकर्णी यांचं मुळात भारदस्त व्यक्तीमत्व असल्याने जिजामाताची भूमिका त्या उत्तम साकारताना दिसून येत आहेत. यात नीना कुलकर्णी जिजाऊंच्या भूमिकेत स्वराज्याचा राजा घडवण्यासाठी जिजाऊ शिवबांना न्यायाचे, शास्त्राचे आणि धर्माचे धडे देताहेत. पण खऱ्या आयुष्यात नीना कुलकर्णी यांनी त्यांच्या मुलीलाही अगदी तसंच घडवलंय. होय, आज आम्ही सांगणार आहोत अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या मुलीबद्दल….

मराठी आणि हिंदी मालिकेत नीना कुलकर्णी हे नाव कोणाला माहीत नाही असं नाही. नाटक, मराठी मालिका, हिंदी मालिका, मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री नीना कुलकर्णी. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळे कंगोरे असणाऱ्या, अभिनेत्रीपण कसाला लावणाऱ्या अनेक भूमिका त्यांनी प्रेक्षकांच्या मनात रूजवल्या. छोट्या पडद्यावर त्या जिजाऊंच्या भूमिकेत शिवबांना धडे देताना दिसून येत आहेत. पण त्यांच्या खऱ्या आयुष्यात त्यांना किती मुलं-मुली आहेत, ते काय करतात, असा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडतो. याचीच उत्तम आज आम्ही देणार आहोत.

अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचं नाव दिवेश आणि मुलीचं नाव सोहा असं आहे. अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी ‘चौकट राजा’ चित्रपटात झळकलेले अभिनेते दिलीप कुलकर्णी यांच्याशी लग्न केलं. त्यावेळी दिलीप कुलकर्णी यांचा ‘चौकट राजा’ चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता. दिलीप कुलकर्णी यांनी ‘सर्वसाक्षी’, ‘विनायक’,’आई’ या चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं होतं. एका यशस्वी अभिनेत्याची पत्नीचं सुख नीना कुलकर्णी या उपभोगतच होत्या, तितक्यात त्यांच्या आयुष्यात एका संकटाने दाद ठोठावला. पती दिलीप कुलकर्णी याचं २००२ मध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि त्या निराधार झाल्या.

पतीची साथ सुटल्यानंतर त्या खचल्या नाहीत आणि आपल्या दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी धडपड करत राहिल्या. त्यांनी अभिनय क्षेत्रातील घोडदौड सुरूच ठेवली आणि दुसरीकडे मुला-मुलींचं करिअर घडवण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले. आपल्या मुला-मुलींना उत्तम शिक्षण आणि संस्कार देऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. आज त्यांची ही स्वप्न दोन्ही मुला-मुलीने पूर्ण केली आहेत. अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची मुलगी सोहा एका बड्या चॅनलची हेड आहे. सोनी मराठी या चॅनलमध्ये ती क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. सोहा तिच्या सोशल मीडियावर सुद्धा बरीच सक्रिय असते. तिच्या सोशल मीडियावर आपल्या कुटूंबासोबतचे फोटोज नेहमीच ती शेअर करताना दिसून येते.

अभिनेत्री नीना कुलकर्णी यांचा मुलगा दिवेश हा एक उत्तम क्रिकेटपटू आणि फोटोग्राफर सुद्धा आहे. त्याला भटकंतीची आवड असून वेगवगेळ्या ठिकाणचे क्लिक केलेले फोटोज तो त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतंच तो ‘द पॅक’ या प्रोडक्शन हाऊससाठी स्टोरी एक्गेजरेटर म्हणून काम करतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Divij (@divij123)

नीना कुलकर्णी यांनी पतीच्या निधनानंतर दोन्ही मुला-मुलीच्या उत्तम भविष्यासाठी बराच संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष फळाला आला असून त्याची दोन्ही मुलं-मुली त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Neena kulkarni family and her daughter soha kulkarni and son divesh kulkarni prp

ताज्या बातम्या