संगीत क्षेत्रातील एक सुरेल आवाज म्हणजे गायिका नेहा कक्कर. आपल्या आवाजामुळे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या नेहाने आतापर्यंत अनेक चित्रपटांना आवाज दिला आहे. यापैकी ‘काला चश्मा’, ‘कर गई चुल’, ‘लंडन ठुमकदा’ ही तिची गाणी तुफान गाजली. विशेष म्हणजे संगीत क्षेत्रात वावरणारी नेहा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. त्यामुळे सध्या तिने इन्स्टावर शेअर केलेला एक व्हिडिओ तुफान गाजत आहे.

काही दिवसापूर्वी नेहाने प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मेल्विन लुईससोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्य नेहाने ‘लूडो खेलूंगी’ या गाण्यावर ठेका धरला होता. हा व्हिडिओ त्यावेळी चाहत्यांमध्ये तुफान गाजला होता. त्यानंतर नेहाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओदेखील चाहत्यांच्या पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे.

सध्या चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आगामी ‘सिम्बा’ हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील ‘आंख मारे’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. यामध्ये आंख मारे हे गाणं चाहत्यांच्या पसंतीत उतरल असून या गाण्याला नेहाने आवाज लाभला आहे. विशेष म्हणजे या गाण्याला आवाज देणारी नेहा चक्क याच गाण्यावर थिरकली आहे. त्यामुळे तिचा हा जबरदस्त डान्स प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, नेहाने आपल्या इन्स्टाग्रामवर डान्सचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तिचा कोरिओग्राफर मेल्विन लुईस सुद्धा डान्स करत आहे. नेहाचा डान्स पाहता ती नृत्यकौशल्यात पारंगत असलेल्या एखाद्या नर्तकीसारखी प्रत्येक स्टेप करत आहे. नेहाने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे गाणे गायले आहे. आता सध्या ती स्वतः इंडियन आयडल शोमध्ये प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहे.

 

Story img Loader