‘सौदागर’, ‘हीरो’, ‘खलनायक’, ‘परदेस’, ‘ताल’, ‘कर्मा’, ‘यादें’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनी ८० व ९० च्या दशकात गाजलेल्या अनेक सिनेमांचेही दिग्दर्शन केले होते. अलीकडेच एका अभिनेत्रीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिने आरोप केला आहे की, दिग्दर्शकाने तिला पार्टीच्या बहाण्याने त्यांच्या घरी बोलावले आणि तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला.

आम्ही बोलत आहोत नेहल वडोलियाबद्दल. नेहल वडोलिया नुकतीच एजाज खानच्या वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘हाऊस अरेस्ट’मध्ये दिसली होती. या शोमुळे बराच वाद निर्माण झाला होता. आता ‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीतून नेहा वडोलियाने खळबळ उडवून दिली आहे. तिच्या मुलाखतीत अभिनेत्रीने सुभाष घईंवर अनेक गंभीर आरोप केले. तिने आरोप केला की, दिग्दर्शकाने तिच्याशी गैरवर्तन केले.

नेहलचे सुभाष घईंवर गंभीर आरोप

अभिनेत्री नेहल म्हणाली की, ती त्यावेळी सुभाष घईंच्या मॅनेजरला डेट करीत होती. दोघांनी नुकतेच डेट करायला सुरुवात केली होती आणि नुकतीच भेट झाली होती. अभिनेत्री म्हणाली की, त्यांच्यात काहीही शारीरिक संबंध नव्हते. त्यांना फक्त त्यांचे नाते कुठे जाईल ते पाहायचे होते. एके दिवशी तिच्या प्रियकराने तिला सांगितले की, तो सुभाष घईंचा मॅनेजर आहे.

एके दिवशी ते दोघेही दिग्दर्शकाच्या घरी गेले. नेहल म्हणाली की, एके दिवशी तिच्या प्रियकराने सांगितले की, ते सुभाष घईंच्या घरी पार्टी करतील आणि पार्टीनंतर सुभाष घई तिच्याशी विचित्र वागले. अभिनेत्री म्हणाली, “मी त्यावेळी दारू पीत होते आणि आम्ही एका खोलीत बसून दारू पीत होतो, तेव्हा अचानक माझ्या हातातून ते पडले आणि सुभाष घई म्हणाले की, ते मला बाल्कनी दाखवतील आणि त्यांच्या बाल्कनीतून शहर कसे दिसते ते दाखवतील.”

नेहल पुढे म्हणाली, “त्यानंतर ते अचानक माझ्या जवळ येऊ लागले आणि विचित्र गोष्टी बोलू लागले. ‘तू छान दिसतेस, तू सुंदर दिसतेस. तुझे हास्य गोड आहे. मला अस्वस्थ वाटले म्हणून मी बाथरूममध्ये गेले… माझा बॉयफ्रेंड तिथे होता आणि मग सुभाष घई माझ्या इतक्या जवळून गेले की, मला खूप अस्वस्थ वाटले. मी दूर जाण्याचा प्रयत्न केला; पण जागा नव्हती आणि सुभाष घईंचे ओठ माझ्या गालाला स्पर्शले.”

अभिनेत्री म्हणते की, तिने तिच्या प्रियकराला याबद्दल सांगितले आणि मी त्याला विचारले की, तो सुभाष यांचा मॅनेजर असल्याने त्याला याबद्दल आधीच माहीत होते आणि तो अविश्वासू आहे. या विधानाने नेहल वडोलियाने तिच्या प्रियकराशी संबंध तोडले.