यावर्षी फेब्रुवारीमध्ये ‘द फेम गेम’ ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सिरीजला चांगला प्रतिसाद मिळाला. अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने या वेब सिरीजमधून ओटीटीवर पाऊल टाकले. या सिरीजचा पहिला सीझन सुपरहिट झाला. अनामिका आनंद या अभिनेत्रीच्या आयुष्याभोवती ही सिरीज फिरते. यात अनामिका आनंद ही भूमिका मधुरी दीक्षितने साकारली. पहिला सीझन हिट झाल्यानंतर या सिरीजच्या निर्मात्यांनी आणि नेटफ्लिक्सने या सिरिजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली. परंतु आता नेटफ्लिक्सने ‘द फेम गेम’चा दुसरा सीझन त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा : ‘मेगा ब्लॉकबस्टर’ चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक प्रदर्शित, रोहित शर्माने वेधले लक्ष

‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘द फेम गेम 2’ या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार होती. पण आता नेटफ्लिक्स इंडियाने या सिरीजचा दुसरा सीझन रद्द करत त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्समधून वगळला आहे. नवनवीन निर्माते आता ओटीटीकडे वळू लागले आहेत, नवीन उत्तमोत्तम स्क्रिप्ट्स ओटीटीसाठी तयार केल्या जात आहेत त्यांच्या तोडीस तोड ‘द फेम गेम 2’ची स्क्रिप्ट नव्हती, म्हणून नेटफ्लिक्सने हा निर्णय घेतला आहे. परंतु हा सीझन नेटफ्लिक्सला का प्रदर्शित करायचा नाही याचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. ते चांगल्या स्क्रिप्टपासून ते बजेटपर्यंत काहीही असू शकते असे बोलले जात आहे.

‘द फेम गेम’ या सिरीजचा पहिल्या सीझनला चांगला प्रतिसाद मिळाल्याने ‘नेटफ्लिक्स’ला याचा दुसरा सीझन प्रदर्शित करायचा होता. आता जर स्क्रिप्टमध्ये बदल करून ती सुधारण्यात आली तर नेटफ्लिक्स पुन्हा एकदा हा दुसरा सीझन प्रदर्शित करण्याचा विचार करेल अशीही माहिती समोर आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : अनिल कपूरसोबत लग्न करण्याच्या प्रश्नावर माधुरीचे थेट उत्तर, म्हणाली “त्याच्याशी लग्न करायला…”

‘द फेम गेम’ची निर्मिती करण जोहरने केली होती. या सिरीजमध्ये अभिनेत्री मधुरी दीक्षितव्यतिरिक्त संजय कपूर, मानव कौल, मकरंद देशपांडे, शुभांगी लाटकर, लक्षवीर सरण, मुस्कान जाफरी, गगन अरोरा हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकले होते.