बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्तपणे सामाजिक विषयांवर तिचे मत मांडताना दिसते. अनेकदा तिला या गोष्टीमुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात येते. यावेळी देखील असेच काहीसे झाले. पण स्वरा शांत बसली नाही तिने त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे. एका नेटकऱ्याने स्वराला दिसण्यावरून ट्रोल करत म्हणाला, "माझी मोलकरीण साडीत तुझ्या पेक्षा चांगली दिसते." हे ट्वीट पाहिल्यानंतर स्वराने त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे. स्वरा म्हणाली, "मला खात्री आहे की तुमची मोलकरणी सुंदर दिसत असेल. मला आशा आहे की तुम्ही तिच्या कामाचा आदर करत असाल आणि तिच्यासोबत मूर्खासारखं वागत नसणार." स्वराचे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. आणखी वाचा : “तर निक माझा जीव घेईल…”, प्रियांकाला वाटते पतीची भीती आणखी वाचा : “२०१४ पूर्वी कंगना हृतिक आणि आदित्य पांचोलीच्या ताब्यात होती…”, म्हणतं अभिनेत्याने उडवली खिल्ली स्वराने 'प्रेम रतन धन पायो', 'वीरे दी वेडिंग' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी तिची 'भाग बिनी भाग' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. स्वराचा 'शीर कुर्मा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्यासोबत दिव्या दत्ता आणि शबाना आझमी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.