‘मिसमॅच्ड’ हा २०२० सालामध्ये आलेला नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब शो पैकी एक आहे. ही एक रोम-कॉम वेब सीरीज असून यात लोकप्रिय युट्यूबर  प्राजक्ता कोळीने डिम्पल अहुजाची तर अभिनेता रोहित सराफने ऋषी शेखावतची प्रमुख भूमिका साकारली होती.  प्राजक्ता आणि रोहितची ही जोडी प्रेक्षकांना फारच आवडली आहे. त्यांच्यातल्या केमिस्ट्रीने लाखो प्रेक्षकांची खास करून तरुणांची मनं जिंकली. त्यामुळे या शोचा दुसरा सिझन कधी येणार याची चाहचे आतुरतेने वाट पाहत आहेत.

रोहित आणि प्राजक्ता सोशल मीडीयावर चांगलेच सक्रिय आहेत. ते सतत आपल्या चाहत्यांशी संर्पकात राहतात, त्यांच्याशी संवाद साधत असतात. रोहितने नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून त्याचे चाहते चांगलेच कोड्यात पडले आहेत. रोहितने इंनस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले. पहिल्या फोटोत प्राजक्ता आणि रोहित दोघेही शोचे दिग्दर्शक अकर्श खुराना सोबत पोझ देताना दिसतं आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये रोहित आणि प्राजक्ता ‘मिसमॅच्ड’च्या सहकलाकारांबरोबर एक सेल्फी कढताना दिसत आहेत.  रोहितने क्यूट इमोजी सह ही पोस्ट इंनस्टाग्रामवर शेअर केली. ही पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी यावर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केल्याचे दिसून येत आहे.

रोहितच्या पोस्टवर एका युजरने तर प्रश्न विचारला,  “दुसरा सिझन कधी येणार?”  ‘ तर आणखीन एक युजर म्हणाला,  “.येस मला विश्वासच बसत नाहीय की दुसरा सिझन येतोय” तर दुसरीकडे शोच्या  प्रोडक्शन हाउसने (आरएसव्हिपी मुव्हीज )ने केलेल्या कमेंटने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. “आपल्याला रीयूनियन हवं आहे” अशी कमेंट त्यांनी केलीय .तर या पोस्टवर प्राजक्ता म्हणाली, “याच्या पेक्षा छान कॅप्शन असूच शकत नाही” . रोहितने शेअर केलेल्या पोस्टवरून काही चाहते असा ही तर्क लावत आहेत की कदाचीत ही भेट दुसऱ्या सिझनसाठी असू शकेल.

हे देखील वाचा: चोली के पिछे क्या है’ गाण्याचा ‘तो’ व्हिडीओ पाहून माधुरी दीक्षित आणि सुभाष घई भावूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Rohit-saraf-instagram-page
photo- Rohit Saraf instagram

‘मिसमॅच्ड’  हा नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय शो असून यूट्यूबर मोस्टलीसेन म्हणजेच प्राजक्ता कोळीची ही डेब्यु वेब सीरीज आहे. या वेब सीरिजचा दुसरा सिझन वर्षा अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. यात प्राजकता ,रोहीत बरोबरच कृतिका भारद्वाज, मुस्कान जाफरी , विद्या मालवडे, तारूक रैना, निधी सिंग हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.