‘कसे आहात मंडळी, हसनाय ना, हसायलाच पाहिजे’ असं म्हणत गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या लोकप्रिय कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, मराठी चित्रपट, नाटक क्षेत्रासह राजकारणातील दिग्गज मंडळी येऊन गेली आहेत. नुकतंच ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हजेरी लावणार आहे. त्याचा आगामी रक्षाबंधन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो या शोमध्ये येणार आहे.

नुकतंच ‘झी मराठी’ने त्याचे काही प्रोमो व्हिडीओ फेसबुकवर शेअर केले आहे. यातील एका व्हिडीओत चला हवा येऊ द्या च्या अक्षय कुमारचे मंचावर छान बँड बाजाने स्वागत होताना दिसत आहे. यावेळी अक्षय कुमार हा सुरुवातीला निलेश साबळेची गळाभेट घेतो. त्यानंतर तो बँडच्या तालावर ठेका धरुन नाचायला लागतो. यानंतर अक्षय बँड वाजवणाऱ्यांचे आभार मानतो.

“आयला रे आयला ‘सूर्यवंशी’ आयला”; ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर थिरकला अक्षय कुमार

यानंतर भाऊ कदम यांनी अक्षय कुमारच्या ‘हेरा फेरी’ या चित्रपटावरुन त्यांची खिल्ली उडवली. यावेळी भाऊ कदम म्हणतो की, ठमी अक्षय कुमारला फार चांगला ओळखतो. आमचं दररोज बोलणं होतं. गाडी मागे घेताना दररोज ते माझ्याशी बोलतात, असे विनोदी स्वरात सांगताना दिसत आहे.

यापुढे निलेश साबळे हा सूर्यवंशी चित्रपटातील अक्षय कुमारच्या एंट्रीचा सीन विनोदी पद्धतीने करुन दाखतो. त्यावेळी निलेश साबळे हा हेलिकॉप्टरच्या ऐवजी पंखा घेऊन एंट्री करतो. त्यावर त्याला भारत गणेशपुरे हा हेलिकॉप्टर आहे का? असे गंमतीत विचारतात. त्यावर निलेश साबळे म्हणतो, “गेल्यावेळी मला अक्षय सरांनी सांगितले होते की मी तुमच्याकडे आतापर्यंत तीन वेळा आलोय, जेव्हा मी पुढच्यावेळी येईन तेव्हा दोन गोष्टी बदला. पहिलं तर अक्षय कुमार बदला आणि दुसरं म्हणजे माझी एंट्रीही थोडी धमाकेदार करा. काहीतरी चांगलं करा, थोडा खर्च करा, इतका चांगला शो आहे.”

तू एका वर्षात ५ ते ६ चित्रपट कसे करतोस? अक्षय कुमार म्हणतो “मी आज पैशांसाठी…”

त्यावर आम्ही म्हणालो होतो की, “नक्कीच सर तुम्ही पुढच्यावेळी जेव्हा इकडे याल तोपर्यंत आम्ही पैसे जमा करु आणि एखादा हेलिकॉप्टर खरेदी करु. त्यातून मी एंट्री करेन. त्यावर भारत गणेशपुरे त्याला सांगतात अरे हा नुसता पंखा आहे.” यावर निलेश साबळे म्हणतो, “तीन महिन्यात नवीन चित्रपट घेऊन आले, तोपर्यंत आमचं एवढंच बजेट जमलं. थोडं थांबले असते तर आम्ही घेतलं असतं.” यावर अक्षय कुमारही खळखळून हसत दाद देताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान येत्या ११ ऑगस्टला अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘रक्षाबंधन’ प्रदर्शित होत आहे. त्याच दिवशी करीना कपूर आणि आमिर खान यांचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक यातील कोणत्या चित्रपटाला पसंती देतात, कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.