बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्राचा नवरा आणि अमेरिकेचा लोकप्रिय गायक निक जोनसचे चाहते संपूर्ण जगात आहेत. गेल्या काही दिवसांपासून निकची काही इंटिमेट गाणी प्रदर्शित झाली आहेत. तर प्रत्येकाची स्वत:ची सेक्स प्लेलिस्ट असावी असे निकला वाटते. निकची देखील स्वत:ची एक सेक्स प्लेलिस्ट आहे. मात्र, या प्लेलिस्टमध्ये निकचं एकही गाणं नाही. याचा खुलासा स्वत: निकने एका मुलाखतीत केला आहे.

निकने नुकतीच ‘जीक्यू’ या मॅग्झिनला मुलाखत दिली. या मुलाखतीत निकने त्या प्लेलिस्ट विषयी सांगितले आहेत. यावेळी निकला लव्हमेकिंगवेळी त्याच्या गाण्यांच्या वापराबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. “मला वाटते की हे कौतुक थोडे जास्त झाले. एक चांगली प्लेलिस्ट असणे गरजेचे आहे आणि माझी स्वत:ची देखील एक प्लेलिस्ट आहे. पण मी माझ्या प्लेलिस्टमध्ये माझ्या गाण्यांचा समावेश करत नाही. हे अगदी वेगळं आहे पण दुसऱ्यांनी माझी गाणी त्यांच्या प्लेलिस्टमध्ये अॅड करायला पाहिजे असे मला वाटते, असं निक म्हणाला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by NICK JONɅS (@nickjonas)

पुढे निकला त्याचे चाहते त्याला सेक्स सिंबल म्हणून बोलतात यावर प्रश्न विचारण्यात आला. याच उत्तर देत निक म्हणाला, ” हे देखील खूप मोठ कौतुक आहे. परंतु आकर्षण ही अगदी लहान गोष्ट आहे. जे मी फार गांभीर्याने घेत नाही. मी फक्त यावर हसायला शिकलो कारण माझे आई-वडील देखील या कमेंट्स वाचत असतात. माझ्यासाठी हा मोठा सन्मान नाही. मी यावर विचार करणे टाळतो, कारण मला थोडी लाज वाटते.”

आणखी वाचा : अनुष्का शेट्टी वयाने लहान असणाऱ्या व्यावसायिकाशी करणार लग्न?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही महिन्यांपासून निक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. सध्या निक आणि प्रियांका हे दोघेही लंडनमध्ये आहेत. प्रियांका ही सीटाडेल या तिच्या आगामी सीरिजच्या चित्रकरणात व्यस्त आहे. तर निक त्याच्या नवीन गाण्यांवर काम करत आहे. या दोघांनी ऑस्कर २०२१ चे सुत्रसंचालन केले होते.