बॉलिवूडमधील आघाडीची डान्सर म्हणजे नोरा फतेही. तिने तिच्या उत्कृष्ट नृत्याने लाखों लोकांचे मन जिंकली आहेत. तिच्या मनमोहक अदाकारीने तिच्या चाहत्यांना तिने घायाळ केले आहे. नोराचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. पण या वेळी नोरा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे.

अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती तिच्या इन्स्टग्रामवर फिटनेस संबंधित फोटो आणि व्हिडीओसुद्धा शेअर करत असते. नोराने नुकतीच इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. नोराने यात गुलाबी टॉप आणि काळ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केले दिसत आहेत. त्यात ती हेवी वर्कआउट करताना दिसत आहे. या स्टोरी मध्ये नोरा सगळ्यांना वर्कआऊटसाठी प्रोत्साहीत करताना दिसत आहे. जिम मध्ये वर्कआऊट करताना ती सांगते की “तुमचा वीकएंड असला तरी तुम्ही व्यायाम करायलाच  हवा.”

nora-fatehi-weekend-workout

नोराने आजवर बऱ्याच म्युझिक व्हिडिओ मधून प्रेक्षकांना आपल्या दमदार नृत्याची झलक दाखवली आहे. ‘ओ साकी साकी’,’कमरिया’, ‘दिलबर’ आणि ‘गरमी’ असे नोराचे गाजलेले म्युझिक व्हिडिओ आहेत. नोराने एका मुलाखतीत आपल्या स्ट्रगल बद्दल बोलताना सांगितले की, “बॉलिवूडमध्ये काम करण सोपे नाही आणि तुम्हाला काम करण्यासाठी प्रचंड मेहेनत करायला लागते.”

 

View this post on Instagram

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

दरम्यान नोरा अजय देवगण, संजय दत्त , सोनाक्षी सिन्हाच्या आगामी चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा आहे. तसेच टायगर शेराॅफच्या ‘गणपत’या चित्रपटात काम करणार अशीही चर्चा रंगत होती. पण तिने एका मुलाखतीत काम करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.