ओडिशाचे प्रसिद्ध गायक मुरली महापात्रा यांचे निधन झाले आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात गाणे गात असताना ते स्टेजवर कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकजण याबाबत शोक व्यक्त करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील प्रसिद्ध गायक मुरली महापात्रा हे ओडिशातील जयपूर शहरातील कोरापूट या ठिकाणी दुर्गापूजा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी चार गाणी गायली. यानंतर पाचवे गाणे सुरु होण्यापूर्वी ते काही काळ विश्रांती घेण्यासाठी स्टेजवर एका खुर्चीवर बसले. त्यानंतर ते गाण्यासाठी उभे राहिले असता ते अचानक स्टेजवर कोसळले. त्यांचे भाऊ बिभूती प्रसाद महापात्रा यांनी याबद्दलची माहिती दिली.
आणखी वााचा : Bigg Boss Marathi 4 : ‘शेवंता’, किरण माने अन् ‘मिसेस मुख्यमंत्री’…, ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी होणाऱ्या कलाकारांची संपूर्ण यादी

मुरली महापात्रा यांची तब्ब्येत आधीच ठिक नव्हती, असे बोललं जात आहे. त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा होता. त्यांचा हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी दूरदूरवरुन लोक आले होते. मात्र या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. मुरली यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. ते स्टेजवर कोसळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या चाहत्यांसह सर्वांनाच धक्का बसला आहे.

आणखी वाचा : “माझा बाबू आता या जगात नाही…” ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्याच्या १९ वर्षीय मुलाचे निधन

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही मुरली महापात्रा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते ट्वीट करत म्हणाले, “लोकप्रिय गायक मुरली महापात्रा यांच्या निधनाची बातमी ऐकून प्रचंड दुःख झाले. त्यांचा मधुर आवाज श्रोत्यांच्या हृदयात नेहमीच आनंदाची भावना निर्माण करेल. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुरली महापात्रा यांच्या निधनानंतर अनेकजण प्रसिद्ध गायक केकेची आठवण काढत आहे. केकेचाही स्टेजवर परफॉर्म करताना मृत्यू झाला होता. स्टेजवर परफॉर्म करताना केके कोसळल्याने चाहते खूप अस्वस्थ झाले होते. केकेच्या मृत्यूनंतर स्टेजवर परफॉर्म करताना मुरली यांचा अचानक मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.