राधिका आपटे ‘फोबिया’ हा नवा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही बघितलाच असेल. त्यानंतर या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनचं वाढली आहे. नुकताचं या चित्रपटाचा नवा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. हे पोस्टर सगळ्यांनाच अचंबित करणारे आहे. पोस्टर पाहिल्यानंतर ‘फोबिया’ चित्रपटाबद्दलची तुमची उत्कंठा आणखी वाढली असेल याबाबतत शंका नाही.
‘फोबिया’ या चित्रपटात राधिका ही एगोराफोबिया या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलीची भूमिका साकारत आहे. हा आजार असलेल्या व्यक्तीला सार्वजनिक स्थळी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाण्याची भीती वाटते. एका रात्री तिच्यासोबत अशी काही घटना घडते की ज्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. विकी रजनीच्या सायकोलॉजीकल थिमवर आधारीत ‘फोबिया’ चित्रपटाचे दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केले आहे.
‘फोबिया’ चित्रपट येत्या २७ मेला प्रदर्शित होईल.
Here’s presenting the Official Poster of this year’s scariest psychological thriller #Phobia, releasing on 27th May! pic.twitter.com/vW3Db4ZFR3
— Eros Now (@ErosNow) May 23, 2016
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.