९६ व्या अकादमी पुरस्कारांची म्हणजेच ‘ऑस्कर २०२४’ बद्दल जगभरात मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. मनोरंजन विश्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या पुरस्काराची प्रत्येक कलाकार आतुरतेने वाट पाहत असतो. यावर्षीचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा लॉस एंजेलिसमध्ये पार पडणार आहे. सध्या या सोहळ्याची अमेरिकेत जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय भारतीय प्रेक्षकांना या कार्यक्रमाचं लाइव्ह टेलिकास्ट ११ मार्चला पहाटे पाहता येणार आहे.

जगभरातील सिनेप्रेमी ऑस्कर पुरस्कारांची आतुरतेने वाट पाहत असतात. कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये १० मार्चला हा भव्य रेड कार्पेट सोहळा पार पडणार असून जिमी किमेल यंदा चौथ्यांदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय प्रेक्षकांना यंदा हे पुरस्कार कधी व कुठे पाहता येतील? जाणून घेऊयात…

हेही वाचा : पैठणी साडी, नाकात नथ अन्…; पुरस्कार सोहळ्यासाठी शिल्पा शेट्टीचा पारंपरिक लूक, मराठीत संवाद साधत म्हणते…

‘ऑस्कर २०२४’ हा सोहळा भारतीय वेळेनुसार ११ मार्च २०२४ रोजी पहाटे ४ वाजता (सोमवारी पहाटे) डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रेक्षक लाइव्ह पाहू शकतात. हॉटस्टारच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून नुकतीच यासंदर्भात पोस्ट शेअर करण्यात आली आहे. “ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं लाइव्ह स्ट्रिमिंग ११ मार्चला होणार आहे. तयार व्हा!” असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे.

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’चा पुन्हा एकदा जलवा! ‘झी चित्र गौरव’ सोहळ्यात ‘या’ पुरस्कारांवर कोरलं नाव, सुकन्या मोने म्हणाल्या…

क्रिस्टोफर नोलनच्या ओपनहायमर या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात दबदबा पाहायला मिळत आहे. या सिनेमाला एकूण १३ नामांकने मिळाली आहेत. याशिवाय ‘बार्बी’, ‘पूअर थिंग्स’ आणि ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ या चित्रपटांमध्ये देखील चांगलीच चुरस रंगणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा ऑस्कर पुरस्कार सादरकर्त्यांमध्ये एकाही भारतीय अभिनेत्रीचं नाव नाही. यापूर्वी प्रियांका चोप्रा दीपिका पदुकोण या अभिनेत्रींना ऑस्कर प्रेजेंट करण्याचा सन्मान देण्यात आला होता. यावर्षी निकोलस केज, अल पचिनो, झेंडाया, सॅम रॉकवेल, बॅड बनी, ड्वेन जॉन्सन, ख्रिस हेम्सवर्थ, जेनिफर लॉरेन्स, एमिली ब्लंट, एरियाना ग्रांडे, टिम रॉबिन्स, स्टीव्हन स्पीलबर्ग या सेलिब्रिटींचा ऑस्कर सादरकर्त्यांच्या यादीत सहभाग आहे.