OTT Release this Week : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनेक उत्तम चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. या आठवड्यात ओटीटीवर काय पाहावं, असा विचार तुम्ही करीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. २५ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत कोणते चित्रपट आणि सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत याच्या यादीवर एक नजर टाकूया.

मेट्रो इन दिनों

अनुराग बासू दिग्दर्शित ‘मेट्रो इन दिनों’ हा चित्रपट नेटफ्लिक्सच्या OTT प्लॅटफॉर्मवर २९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, अनुपम खेर, नीना गुप्ता, अली फजल, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी व फातिमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

माय डेड फ्रेंड जो

‘माय डेड फ्रेंड जो’ हा डार्क कॉमेडी ड्रामा चित्रपट २८ ऑगस्टपासून ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर पाहण्यासाठी उपलब्ध असेल.

माय लाईफ विथ द वॉल्टर बॉईज : सीझन २

‘माय लाईफ विथ द वॉल्टर बॉईज’चा सीझन २ ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर २८ ऑगस्टपासून स्ट्रीम होईल. १० एपिसोड्सचा हा सीझन तुम्हाला नक्की आवडेल.

साँग्स ऑफ पॅराडाईज

‘साँग्स ऑफ पॅराडाईज’ २९ ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होईल. त्यामध्ये सबा आझाद महान काश्मिरी गायिका राज बेगमची भूमिका साकारत आहे.

द टर्मिनल लिस्ट : डार्क वुल्फ

‘द टर्मिनल लिस्ट : डार्क वुल्फ’ २७ ऑगस्टपासून प्राइम व्हिडीओवर प्रसारित होईल. त्याचे पहिले तीन भाग प्रीमियरच्या दिवशी प्रदर्शित होतील. त्यात टेलर किच, ख्रिस प्रॅट, टॉम हॉपर व रोना-ली सिमियोन मुख्य भूमिकेत आहेत.

द थर्सडे मर्डर क्लब

‘द थर्सडे मर्डर क्लब’ २८ ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रिचर्ड ओस्मान यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.

थंडरबोल्ट्स

‘थंडरबोल्ट्स’ हा अ‍ॅक्शन सायन्स चित्रपट २७ ऑगस्टपासून ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट २२ एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता; परंतु बॉक्स ऑफिसवर तो चांगली कामगिरी करू शकला नाही.