तुम्हाला ओटीटीवर जगभरातील चित्रपट, वेब सीरिज व शो पाहायला आवडत असतील तर एक सीरिज अजिबात चुकवू नका. या सीरिजमध्ये चार हिरो आहेत. चार एपिसोड्सची ही सीरिज ओटीटीवरील आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी कलाकृतींपैकी एक आहे. या सीरिजचं बजेट तब्बल १०० कोटी रुपये आहे. या सीरिजमध्ये तीन नावाजलेले कलाकार व एक नवखा अभिनेता आहे.

भारतातील एका सत्य घटनेवर आधारित या सीरिजने लोकांना हादरवून सोडलं होतं. ही सीरिज आल्यानंतर तब्बल ४० वर्षांपूर्वी घडलेल्या त्या दुर्घटनेच्या दुःखद आठवणी ताज्या झाल्या होत्या. कोणती आहे ही सीरिज? जाणून घेऊयात.

चार एपिसोडची आहे सीरिज

चार एपिसोडच्या या सीरिजचे नाव ‘द रेल्वे मॅन’ आहे. याची निर्मिती नेटफ्लिक्स व वायआरएफ एंटरटेनमेंटने एकत्र केली आहे. या सीरिजचं प्रचंड कौतुक झालं. यात आर माधवन, दिव्येंदु, केके मेनन आणि दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या सीरिजमधील सर्व कलाकारांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

भोपाळमधील गॅस दुर्घटनेवर आधारित सीरिज

‘द रेलवे मॅन’ सीरिजचे दिग्दर्शन शिव रवैलने केले आहे. ही सीरिज १९८४ सालच्या भोपाळमधील गॅस दुर्घटनेवर आधारित आहे. या सीरिजची कथा मुख्य चार पात्रांभोवती फिरताना दिसते. ज्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी या दुर्घटनेत लोकांचे जीव वाचवले होते, त्या कर्मचाऱ्यांवर ही सीरिज बेतलेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीरिजची दमदार कथा व आयएमडीबी रेटिंग

या चार सामान्य लोकांच्या हिमतीने संपूर्ण राज्याला संकटातून वाचवण्याची जबाबदारी घेतली होती. या चौघांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचवले आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले. ‘द रेल्वे मॅन’ ही वेब सीरिज खूप गाजली. दमदार स्टारकास्ट व उत्तम कथा आणि उत्कृष्ट अभिनय यामुळे ही सीरिज खास ठरली. या सीरिजला IMDb वर तिला १० पैकी ८.५ असे जबरदस्त रेटिंग मिळाले आहे. तुम्ही ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.