गेल्या काही वर्षांपासून ओटीटी हे नवीन लोकप्रिय माध्यम म्हणून उदयास आलं आहे. या माध्यमाने अनेक कलाकारांना नवी ओळख दिली. या माध्यमात चित्रपटसृष्टीतील स्टार मंडळींबरोबरच अनेक नवोदित कलाकारांनी देखील स्वतःचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आणि प्रसिद्धी मिळवली. आता ओटीटीवरील या स्टारडमबद्दल महेश मांजरेकर यांनी भाष्य केलं आहे.

हिंदी कलाकारांबरोबरच अनेक मराठी कलाकारांचा देखील ओटीटी माध्यमामुळे मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. आज मराठी कलाकारही ओटीटीवर विविध भाषांच्या कलाकृतींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आकारताना दिसतात. ओटीटीवर कोणीही एक स्टार नाही. याबद्दल आता महेश मांजरेकर यांनी त्यांचं मत मांडलं आहे.

आणखी वाचा : “आपल्याकडे शक्य झालं तर…”, ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या बोल्ड आणि भडक दृश्यांबाबत महेश मांजरेकरांनी मांडलं स्पष्ट मत

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, “भूमिका उत्कृष्ट निभावण्यासाठी स्टार नाहीतर योग्य कलाकार पाहायला मिळत आहेत. याचं समाधान ओटीटी माध्यमामुळे प्रेक्षकांना मिळतंय. मराठी मनोरंजन सृष्टीत स्टार जरी नसले तरीही अप्रतिम कलाकार आहेत. आपल्या कलाकारांना नाटकाची पार्श्वभूमी आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : महेश मांजरेकर म्हणतात, “संजय राऊत बिग बॉसच्या घरात आले असते तर…”

पुढे ते म्हणाले, “आज अनेक बड्या स्टार्स चे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत असतानाच कलाकारांचे चित्रपट सुपरहिट ठरत आहेत. याचं श्रेय ओटीटीला देणं आवश्यक आहे. चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारणारे कलाकार आज ओटीटी हे माध्यम गाजवत आहेत.”