scorecardresearch

Farzi Trailer : “गरीब उधारी चुकवणार आणि श्रीमंत…” शाहिद कपूर-विजय सेतूपतीच्या ‘फर्जी’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

शाहिद कपूर, विजय सेतुपती के के मेनन आणि अमोल पालेकर असे दिग्गज कलाकार यात दिसणार आहेत

Farzi Trailer : “गरीब उधारी चुकवणार आणि श्रीमंत…” शाहिद कपूर-विजय सेतूपतीच्या ‘फर्जी’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

आजही दिवसागणिक बनावट नोटा बनवणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. देशभरात अनेक ठिकाणी सर्रासपणे बनावट नोटा बनवल्या जातात. पोलीस अशा लोकांच्या मुसक्या आवळत आहे तरीदेखील याचे प्रमाणे कमी झालेली नाही. ‘बनावट नोटा’ हा मुद्दा घेऊन आता एका नवीन चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येत आहेत. अभिनेता शाहिद कपूर आणि दाक्षिणात्य स्टार विजय सेतुपती पहिल्यांदा एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत.

‘फर्जी’ असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये सुरवातीला शाहिद कपूर मध्यमवर्गातला दाखवला आहे. श्रीमंत होण्यासाठी तो मित्राला सांगतो की बनावट नोटा तयार करून आपण श्रीमंत होऊ शकतो आणि मग ते तयारीला लागतात. दुसरीकडे विजय सेतुपती हा पोलीस अधिकारी दाखवण्यात आला आहे. शाहिद कपूरला पकडण्यासाठी त्याचू नेमणूक केली जाते. या ट्रेलरमध्ये के के मेनन वेगळ्या भूमिकेत दिसला आहे. विजय शाहिदला पडकण्यात यशस्वी होतो का? हे चित्रपट बघितल्यावर कळेल.

पत्रकार परिषदेतील ‘त्या’ कृतीवरून जॉन अब्राहम ट्रोल; ‘पठाण’विषयी विचारला होता प्रश्न

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच चाहत्यांनी कौतुक करण्यास सुरवात केली आहे. एका चाहत्याने लिहले की “शाहिद कपूर X विजय सेतुपती = आगीपेक्षा जास्त” तर दुसऱ्याने लिहले, “आणखी एक उत्कृष्ट चित्रपट पाहायला मिळणार तर” आणखीन एकाने लिहले आहे, “चित्रपटाचा ट्रेलर मस्तच आहे.” अनेक चाहत्यांनी या दोन अभिनेत्यांच्या कास्टिंगचे तसेच इतर कलाकारांचे कौतुक केले आहे.

शाहिद कपूर, विजय सेतुपतीप्रमाणे शी खन्ना, रेजिना कॅसांड्रा आणि भुवन अरोरा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आणि डिके यांनी केले आहे. हा थरारपट १० फेब्रुवारीला अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 15:44 IST

संबंधित बातम्या