OTT Release in Diwali Weekend: पुढील आठवड्यात देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. लोकांनी दिवाळीची तयारी जोमाने सुरू केली आहे. काही जण दिवाळीत बाहेर जाण्याचे नियोजन करत आहेत, तर काही जण घरीच राहणे पसंत करतात. सुट्टी नसणाऱ्या लोकांनाही या आठवड्यात लाँग वीकेंड मिळणार आहे. या वीकेंडला प्लॅन नसेल ते लोक अनेक चित्रपट आणि वेब सीरिज घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर पाहू शकतात.

जर तुम्ही वीकेंडला नवीन चित्रपट किंवा सीरिज पाहण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला या आठवड्यात (१३ ते १९ ऑक्टोबर) प्रदर्शित होणाऱ्या शो आणि चित्रपटांबद्दल सांगतो. यामध्ये अर्शद वारसीचा ‘भागवत चॅप्टर १’, शहाना गोस्वामीचा ‘संतोष’ आणि हॉलीवूड चित्रपट ‘फायनल डेस्टिनेशन: ब्लडलाइन्स’ यांचा समावेश आहे.

भागवत चॅप्टर 1: राक्षस

Bhagwat Chapter 1 Raakshas on Zee5: अर्शद वारसी आणि जितेंद्र कुमार यांचा ‘भागवत चॅप्टर १: राक्षस’ हा चित्रपट या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. अर्शद वारसी या चित्रपटात एका पोलीस निरीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १७ ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 वर पाहता येईल.

फायनल डेस्टिनेशन: ब्लडलाइन्स

Final Destination: Bloodlines : फायनल डेस्टिनेशन फ्रँचायझीमधील सहावा चित्रपट, ‘फायनल डेस्टिनेशन: ब्लडलाइन्स’ या आठवड्यात, १६ ऑक्टोबर रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

एलुमाले

Elumale on Zee5: ‘एलुमाले’ हा रोमँटिक-थ्रिलर चित्रपट या वर्षी सप्टेंबरमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. आता, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. राणा, प्रियंका अचार आणि जगपती बाबू यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तुम्ही तो चित्रपटगृहात पाहिला नसेल तर १७ ऑक्टोबर पासून ZEE5 वर पाहू शकता. चित्रपटाची कथा कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सीमावर्ती भागात घडते. हा चित्रपट हरीश नावाच्या कॅब ड्रायव्हर आणि रेवती नावाच्या एका श्रीमंत महिलेची प्रेमकथा सांगतो.

संतोष

Santosh on OTT: कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्टँडिंग ओवेशन मिळणारा चित्रपट ‘संतोष’ आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. शहाना गोस्वामीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ऑस्करसाठी देखील शॉर्टलिस्ट करण्यात आला होता, परंतु भारतीय सेन्सॉर बोर्डाने त्याला थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला.आता तो १७ ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म लायन्सगेट प्लेवर प्रदर्शित होईल.

संध्या सुरी दिग्दर्शित ‘संतोष’ हा चित्रपट उत्तर भारतातील एका गावात राहणाऱ्या संतोष नावाच्या महिलेची कथा सांगतो. तिचा पती एक कॉन्स्टेबल असतो, तो एका दंगलीत मारला जातो आणि नंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलते.

द डिप्लोमॅट सीझन 3

The Diplomat Season 3 : जर तुम्ही हॉलीवूड सीरिजचे चाहते असाल, तर तुम्ही ‘द डिप्लोमॅट सीझन ३’ पाहू शकता. या सीरिजचे पहिले दोन सीझन चांगलेच गाजले. तिसरा सीझन एका ब्रिटिश राजदूताच्या आंतरराष्ट्रीय संकटाशी लढण्याची कहाणी सांगते. ही सीरिज १६ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.