Elvish Yadav Arrested: ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता व लोकप्रिय युट्यूबर एल्विश यादवला अटक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवठा केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेकडून माहिती देण्यात आली आहे.

एएनआयच्या माहितीनुसार, एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली असून आज कोर्टात हजर केले जाणार आहे, यासंदर्भात डीसीपी नोएडा विद्या सागर मिश्रा यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एल्विशवर रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवठा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात एल्विशविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती. तसेच अलीकडेच याप्रकरणाचे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडून अहवाल आले; ज्यातून रेव्ह पार्टीच्या नमुन्यांमध्ये सापाचं विष असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे एल्विशवर कारवाई होण्याची टांगती तलवार होती.

हेही वाचा – Video: पहिल्यांदा दुसऱ्या लेकाला पाहताच सिद्धू मुसेवालाच्या आई-वडिलांची होती ‘ही’ रिअ‍ॅक्शन; व्हिडीओ होतोय व्हायरल

अखेर आज याप्रकरणी एल्विशला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. तासभराच्या चौकशीनंतर पोलिसांनी एल्विशला अटक केली. आता काही वेळात त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

हेही वाचा – Video: Ed Sheeranच्या सुरेल आवाजात दंग झाला शाहरुख खान, मन्नतमधील Unseen व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एल्विशचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्याने रेव्ह पार्टीमध्ये सापाचं विष पुरवठा केल्याच्या आरोपावर मोठं वक्तव्य केलं होतं. एल्विश म्हणाला होता की, “रेव्ह पार्टीमध्ये एल्विश यादव कुठे होता? पोलिसांनी हे सांगितलं नाही. मूळात मी पोलिसांना सापडलोच नाही, कारण मी मुंबईत होतो. पीएफए गुगल कराल तर तुम्हाला समजेल ते नियम काय आहेत. कुठल्याही सामान्य व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल केला जातो आणि मग त्यांच्याकडून केस मागे घेण्यासाठी पैसे मागतात. त्यामुळे आता हे सिद्ध करू दाखवा की, मी तिथे होतो आणि ती माझी रेव्ह पार्टी होती. जर हे सिद्ध झालं तर मी नग्न होऊन नाचेन.”