युट्यूबर आणि ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादव सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. एल्विशवर रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष आणि परदेश तरुणी पुरवत असल्याचे गंभीर आरोप लावण्यात आला आहे. पण त्याने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. अशातच एल्विशनच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एल्विशची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बॉलीवूडचा भाईजान सलमान खानसंबंधित ही पोस्ट आहे.

हेही वाचा – Video: ईशा केसकरच्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचं दमदार शीर्षकगीत प्रदर्शित, पाहा व्हिडीओ

नुकतीच एल्विश यादवने सोशल मीडियावर सलमान खानबरोबर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या एल्विशच्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एल्विशने सलमानबरोबर फोटो शेअर करून लिहीलं आहे, “वेळ ही एक विचित्र गोष्ट आहे, मी त्याच्याशी जुळवून घेतलं. तू ही खूप जवळ होतास, आता खूप बदलला आहेस.”

हेही वाचा – “मोहन गोखले वर्षभर साजरी करायचे दिवाळी, पाडव्याला….”; शुभांगी गोखलेंनी पतीच्या आठवणींना दिला उजाळा

हेही वाचा – “या मालिकेमुळे मुलांवरती वाईट संस्कार पडत आहेत…” ‘आई कुठे काय करते’चा प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधल्या नोएडा शहरातील सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात एल्विशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात इतर पाच जणांना अटक झाली आहे. या प्रकरणासंदर्भात अलीकडेच एल्विश आपल्या नव्या व्लॉगमध्ये बोलला होता. एल्विश म्हणाला होता, “सध्या सुरू असलेल्या प्रकरणातून मी एक गोष्ट शिकलो आहे की, आयुष्यात चढ-उतार, आनंद-दुःख सर्व काही येतं. जे काही होतंय, ठीक आहे. आयुष्य असंच असतं. मला कोणतं दुःख नाही. अशा गोष्टी होतंच असतात आणि या गोष्टी झाल्या नाही तर आयुष्य कसलं?”