बॉलिवूडमधील राणी मुखर्जी एक गुणी अभिनेत्री आहे. ‘राजा की आयेगी बारात’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता हैं’ चित्रपटाने तिला वेगळी ओळख मिळाली. या चित्रपटातून तिचा ग्लॅमर्स अंदाज दिसून आला. तिने आदित्य चोप्राशी लग्नगाठ बांधली. आदित्य चोप्रा हा दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रांचा मोठा मुलगा. राणीने नुकतेच आपल्या पतीबद्दल भाष्य केले आहे.
राणी मुखर्जी अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळली आहे. ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा तिचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती सध्या व्यस्त आहे. या प्रमोशनदरम्यान तिने आदित्य चोप्रा विषयी बोलताना ती असं म्हणाली, “माझ्या पतीने अनेक अभिनेत्रींबरोबर काम केले आहे. मग मी इतर निर्मात्यांबरोबर काम का करू नये? मला चांगली कथा लागते. मग ते यशराज असो किंवा इतर कोणी, चित्रपट पाहिल्यानंतर आदीला धक्का बसला होता. मी आदीला असे कधीच कोणत्या चित्रपटाच्याबाबतीत धक्का बसल्याचे पहिले नव्हते.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.
राणी मुखर्जीच्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले जात आहे. यात तिचा दमदार अभिनयही पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट १७ मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राणी मुखर्जीबरोबर अनिर्बन भट्टाचार्य, जिम सरभ आणि नीना गुप्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिमा छिब्बर यांनी केले आहे.
