बॉलिवूडमधील राणी मुखर्जी एक गुणी अभिनेत्री आहे. नुकताच तिचा ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सध्या जगभरात चर्चा आहे. राणीच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. या चित्रपटाने जगभरात ३ मिलियनची कमाई केली आहे. नुकतंच तिने ओटीटी माध्यमाविषयी भाष्य केलं आहे.

करोना काळानंतर प्रेक्षकांचा कल मोठया प्रमाणावर ओटीटी माध्यमाकडे वळला आहे. अनेक चित्रपट आता ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होत आहेत. राणीने इटाईम्सशी बोलताना असं म्हणाली, “माझा खरोखर विश्वास आहे की एका चांगल्या चित्रपटाला प्रेक्षक प्रतिसाद देतातच मग तो कोणत्याही प्रकारचा असो, आमच्या चित्रपटापुढे अनेक आव्हाने होती. कारण सध्या एका नव्या शब्दाची फॅशन निर्माण झाली आहे ती म्हणजे ओटीटी, ही गोष्ट मला खूप त्रास देते. कारण चित्रपट हा चित्रपटगृहातच जाऊन अनुभवायला हवा. यावर माझा विश्वास आहे.”

“मला तिने रात्री…” प्रसिद्ध अभिनेते, भाजपा खासदार रवी किशन यांचा कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक खुलासा

ती पुढे म्हणाली, “चित्रपट प्रदर्शित होण्याआधी अनेकांनी यावर टीका केली. मोठ्या संख्येने लोक याला ओटीटी कंटेंट म्हणत होते. हे माझ्यासाठी खरोखरच भीतीदायक होते. कारण जेव्हा विरोध करत असतात आणि तुम्ही एकटे लढत असता तेव्हा तुम्ही फक्त प्रार्थना करू शकता. मीही तेच करत होते जेणेकरून प्रेक्षक माझ्या चित्रपटावर विश्वास ठेवतील आणि तसेच झाले.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट १७ मार्च २०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राणी मुखर्जीबरोबर अनिर्बन भट्टाचार्य, जिम सरभ आणि नीना गुप्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिमा छिब्बर यांनी केले आहे.