अलिकडच्या काळात ‘जवान’, ‘पठाण’, ‘अॅनिमल’, ‘पुष्पा’, ‘जेलर’ असे चित्रपट सिनेमागृहांमध्ये दमदार कमाई करत आहेत. अॅक्शन चित्रपटांची जणू लोकांमध्ये क्रेझ आहे. विनोदी चित्रपटांना आता प्रेक्षकांची फार पसंती मिळताना दिसत नाही. पण काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता, ज्यात अजिबात अॅक्शन सीन नव्हते, तसेच तो मिस्ट्री-थ्रिलर नव्हता, तरी बॉक्स ऑफसवर ब्लॉकबस्टर ठरला होता.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकलेल्या बॉलीवूड अभिनेत्याचा एक चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या अभिनेत्याचं नाव आमिर खान (Aamir Khan). आणि आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय, त्या चित्रपटाचं नाव ‘3 इडियट्स’. हा चित्रपट १६ वर्षांपूर्वी आला होता. यात आमिर खान, शरमन जोशी, आर माधवन व करीना कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

आमिर खानने ‘सरफरोश’, ‘वाजी’, ‘तलाश’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ सारखे अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट दिले आहेत. पण ‘३ इडियट्स’ अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट नव्हता. हा एक विनोदी चित्रपट होता. या चित्रपटातील काही दृश्यांचे व्हिडीओ आताही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. इतक्या वर्षांनंतरही आजही हा सिनेमा प्रेक्षकांना खळखळून हसवतो.

‘३ इडियट्स’चे बजेट व कलेक्शन

3 Idiots Budget and Box Office Collection: ५५ कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने जगभरात ४६० कोटी रुपये कमावले होते. ‘३ इडियट्स’ला आयएमडीबीवर ८.४ रेटिंग मिळाले होते. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

‘३ इडियट्स’ चा तमिळ रिमेक

‘३ इडियट्स’ या गाजलेल्या बॉलीवूड चित्रपटाचा ४ वर्षानंतर तमिळमध्ये रिमेक बनवण्यात आला. विधू विनोद चोप्रा यांनी ‘३ इडियट्स’ चे अधिकार एस. शंकर यांना विकले. या चित्रपटात सूर्या मूख्य भूमिका साकारेल, अशी चर्चा होती. ‘३ इडियट्स’ चं तमिळमध्ये ‘नंबन’ नाव ठरवण्यात आलं.

राज बब्बर-स्मिता पाटील यांच्या लग्नाबद्दल मुलगा आर्य म्हणाला, “हे ऐकून माझ्या आईला आनंद होणार नाही, पण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाचे बजेट ५० कोटी रुपये होते. यात आमिरची भूमिका थलपती विजयने केली होती. तर, करीनाने साकारलेल्या भूमिकेत इलियाना डिक्रुज होती. श्रीकांत व जीवा यांनी इतर महत्वपूर्ण भूमिका केल्या होत्या. तर, सत्यराज यांनी व्हायरसचे पात्र साकारले होते. २०१२ मध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटी रुपये कमावले होते. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.८ रेटिंग मिळाले होते.